येत्या सोमवार पर्यंत वाढीव विज बिले माफ न झाल्यास खळखट्याक आंदोलन करणार..

▪️मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा इशारा..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.२२: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार येत्या सोमवार पर्यंत वाढीव विज बिले माफ न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्गचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली खळखट्याक आंदोलन करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी दिला आहे.

टाळेबंदी दरम्यान वीज मापनाची कोणतीही तांत्रिक पडताळणी न करता अव्वाच्या-सव्वाच्या वीज देयकं नागरिकांना पाठविण्यात आली. आधीच टाळेबंदीमुळे मंदावलेला उद्योग-धंदा, संसाराची विस्कटलेली आर्थिक घडी सहन करणाऱ्या सर्वसामान्यांना हा ‘झटका’ असह्य होता. म्हणून मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ह्याविरोधात आवाज उठविला.

पक्षाच्या नेत्यांचं शिष्टमंडळ ऊर्जामंत्र्यांना भेटलं, खासगी वीज वितरक कंपन्या आंदोलनांनी नरमल्या व त्याही अधिकाऱ्यांनी कैफियत मांडण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली, सरकारच्या कानीकपाळी ओरडूनही सरकार निर्णय घेत नाही असं दिसल्यावर श्री. राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली, महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक शरद पवार ह्यांच्याशी वीज बील माफीसंदर्भात राज ठाकरे यांनी संवाद साधला. तरीही सरकार ढिम्मच. याउलट सरकारनेच ३६० अंशात भूमिका बदलून ‘नागरिकांनी बिलं भरावीत अन्यथा वीज जोडणी कापू’ अशी अरेरावीची भाषा सुरु केली.

सरकारने वीज बिल माफी संदर्भात घेतलेल्या यु-टर्न विरोधात राज्यभर आवाज उठविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पक्षाच्या मुख्यालयात पार पडली. त्यानंतर पक्षाचे नेते बाळा नांदगावकर ह्यांनी पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका मांडली. त्यातील महत्त्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे..

● सरकारमधील तीन पक्षातील श्रेयवादा दाव्यामुळे निर्णय घेतला जात नाहीये तेव्हा सरकारमधील अंतर्गत श्रेयवादाच्या लढाईचा भुर्दंड सामान्य नागरिकांनी का भरावा?

● येत्या सोमवारपर्यंत वीज बिलं माफ केली नाहीत तर राज्यभर महाराष्ट्र नवनिर्माण सेना उग्र आंदोलन उभं करणार

● पक्षातर्फे समस्त महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करत आहोत की, नागरिकांनीही ह्या आंदोलनात सहभागी व्हावं.

● सरकारची मग्रुरीची भाषा पाहता जनक्षोभ उसळला तरंच वीज बिलांमध्ये दिलासा मिळेल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यासाठी रस्त्यावर उतरेल.

● नागरिकांना आवाहन करत आहोत की, वाढीव वीजबिलं भरू नका, सरकारतर्फे वीज जोडणी कापण्यासाठी कुणी आलं तर त्यांना महाराष्ट्र सैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!