कोकणक्राइम

गोव्यातून जिल्ह्यात होणाऱ्या अवैध दारुवाहतूकीला पुर्णपणे लगाम लावण्याच्या दृष्टीने उचलली कठोर पावले-राजेंद्र दाभाडे

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोव्याहून अवैध दारू वाहतूक होणार नाही याची पूर्णपणे दक्षता पोलीस यंत्रणेने घ्यावी अशा सक्त सूचना पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी आज सावंतवाडी पोलीस उपविभागीय कार्यालयाला भेट दिल्यावर पोलिसांना दिल्याचे स्पष्ट केले याबाबत कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल शी बोलताना पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी गोव्याहून होणारी चोरटी अवैद्य मद्य वाहतूक पूर्णपणे बंद होण्याच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे, तपासणी नाक्यावर जादा पोलीस कुमक ठेवण्यात येणार आहे, जी चोरटी वाहतूक अन्य मार्गाने केली जाते, असे मार्ग शोधून त्या ठिकाणी पोलीस तैनात केले जातील,जेणेकरून सिंधुदुर्गात येणाऱ्या सर्व चोरवाटा बंद करण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांना करण्यात आले आहेत त्यामुळे यापुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध दारू वाहतूक होणार नाही असे स्पष्ट केले.
पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी आज बांदा गाळेल येथील कोसळलेल्या डोंगर ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व बांदा या ठिकाणी कोणत्या प्रकारे मदत कार्य भविष्यात राबवता येईल याची चाचपणी केली,
सावंतवाडीतील काही युवक या प्रकरणात अडकले आहेत त्यांचा मुख्य सूत्रधार कोण ते कोणाकोणाच्या संपर्कात होते हे त्यांच्या मोबाईलवरून तपासण्यात येईल व मुख्य सूत्रधार पर्यंत पोहोचून याची पाळेमुळे शोधून काढली जातील असा विश्वास पोलीस अधीक्षक दाभाडे यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल शी बोलताना व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!