सावंतवाडी शहरात साकारलाय शिवरायांच्या पराक्रमासाठी गाजलेला प्रतापगड..
▪️सहाय्यक पोलीस निरीक्षक आण्णासो बाबर व सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. स्वाती यादव यांनी साकारला प्रतापगड..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.१८: शिवरायांचा आठवावा प्रताप! शिवरायांचे आठवावे रूप! या ओळींची आठवण नेहमी तिथेच राहते. दिवाळीत सुट्टीच्या कालावधीत शाळकरी मुले गड किल्ले बनवतात. साधारणता बरेचशे गड किल्ले काल्पनिक स्वरूपाचे बनवलेले असतात. मात्र, आकर्षणाचा विषय ठरतो तो हुबेहूब गड-किल्ल्यांची प्रतिकृती! असाच हुबेहूब व डोळ्यांसमोर उभा राहणारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने गाजलेला अफजल खानच्या वधाची कीर्ती गाजविणारा प्रतापगड साकारण्याचे काम सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासो बाबर व त्यांच्या पत्नी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव आणि त्यांचा लहान मुलगा अथर्व या कुटुंबीयांनी केले आहे.
या प्रतापगडच्या प्रतिकृतीमध्ये प्रतापगडावर पोहोचण्यासाठी असलेल्या प्रवेशद्वारापासून प्रतापगडावर असलेले विविध नावारूपास आलेली ठिकाणे, मंदिरे, बुरुज, तटबंदी दरवाजे, तोफखाने गडाचा आजूबाजूचा परिसर या सर्वांचे हुबेहूब प्रतिकृती बाबर कुटुंबीयांनी साकारली आहे.
गडामध्ये असलेले चिलखती बुरुज, त्याशेजारी शिवरायांचे श्रद्धास्थान असलेले अष्टभुजा भवानी मातेचे आकर्षक मंदिर, मंदिराच्या शेजारी असलेला भवानी बुरूज तेथेच किल्ल्याच्या बांधणीसाठी खोदकाम करत असताना निर्माण केलेला तलाव, शेजारी असलेल्या बालेकिल्ला त्याच्या शेजारी असलेले समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले हनुमानाचे मंदिर, प्रवेशद्वारातून आल्यावर समोरच दिसणारे आकर्षक केदारेश्वराचे मंदिर आणि त्या जवळच छत्रपती शिवाजी महाराजांचा असलेला अश्वारूढ पुतळा, किल्ल्यावरील सैनिकांना सतर्क करण्यासाठी असलेला नगारखाना, किल्ल्याच्या उत्तर बाजूला असलेला तिहेरी बुरुज म्हणजेच तिहेरी तटबंदी, त्याच्या शेजारी असलेल्या यशवंत बुरुज, किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोर असलेला टेहळणी बुरुज म्हणजेच शिवप्रताप बुरुज, या बुरुजाच्या पायथ्याशी त्याच्या शेजारी अफजल खानच्या भेटीसाठी छत्रपतींनी ज्या ठिकाणी शामियाना उभारला होता ती जागा, अफजल खानाचा मृतदेह ज्या ठिकाणी पुरला होता त्या ठिकाणी असलेला शिवप्रताप बुरूज जावळीच्या जंगलात असलेल्या सैनिकांना सतर्क करण्यासाठी वाजविण्यात आलेल्या तोफांची जागा, खंडोजी खोपडेना ज्या ठिकाणी उजवा हात व डावा पाय कलम करण्याची शिक्षा दिली ती जागा, स्वराज्य विरोधात जाऊन गद्दारी करणाऱ्याचा ज्या ठिकाणी कडेलोट व्हायचा ते कडेलोट ठिकाण या सर्वांची प्रत्येक ठिकाणी दाखवून माहिती श्री. बाबर यांनी दिली. तसेच छत्रपती शिवरायांनी अतिशय सूक्ष्म नियोजन करून या प्रतापगड किल्ल्यांची निर्मिती केली असल्याचे ते म्हणाले. तसेच छत्रपती शिवराय प्रमाणात आपल्यालाही आयुष्यात अतिशय सूक्ष्म पद्धतीने नियोजन करून आलेल्या संकटांना तोंड द्यायला हवे असे ते म्हणाले.
*_💥साजरी करा ही दिवाळी 🏮महाराष्ट्रातील नं.१ मोबाईल 🔥चैन SS ‘मोबाईल्स’च्या 🎊’दिवाळी ऑफर्स’ सोबत..🪔_*
*💫स्मार्टफोन खरेदीवर 40% पर्यंत सूट मिळवा*
*💫एक्सेसरीज खरेदीवर 80% पर्यंत सूट मिळवा*
*💫EMI सह स्मार्टफोन खरेदीवर रु.8000 पर्यंतचे कॅशबॅक 💵*
*💫भरा फक्त 99rs & get ur dream phone on loan💵*
*💫स्मार्टफोनवर चक्क! फीचर फोन $ फ्री*
*😍स्क्रॅच अँड वीन अंतर्गत रु. 2499 पर्यंत चे हमखास गिफ्ट 🎁*
*⚡पूर्व गिफ्ट मिळवा एका क्लिक वर👇🏻* http://ssoffers.online/rewards/SS-DIWALI-OFFER
*_🤷🏻♂️आजच SS मोबाइल स्टोअरला 🏬भेट द्या! आणि दिवाळीच्या जबरदस्त🔥ऑफर्स चा लाभ घ्या!🤷🏻♀️_*
*🌈शाखा : सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, चिपळूण, रत्नागिरी, गोवा..*
*_📱Kankavali : 7030934427_*
*_📱Sawantwadi : 7066755656_*
*_📱Kudal : 8956931120_*
*_📱Ratnagiri : 8390455123_*
*_📱Chiplun : 8806779333_*
*_📱Head 0ffice : 8600666111_*
*🌐Buy online*
www.ssmobile.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_