ओव्हरलोड कोळसा वाहतूक तात्काळ बंद करा ; मनसे माजी तालुकाध्यक्ष सुनील गवस यांची मागणी
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*
*🎴दोडामार्ग, दि-२७:-* दोडामार्ग तालुक्यातील वझरे या ठिकाणी वेदांता सेसा गोवा कोक फॅक्टरी असून त्या ठिकाणी पक्का कोळसा बनवण्यासाठी गोव्याच्या दिशेने ओव्हरलोड कच्चा म्हणजेच कोळशाची पावडर फॅक्टरीकडे आणली जाते. सदर मालाची वाहतूक ही 28 टन असून क्षमतेच्या बाहेर म्हणजेच 50 टनाच्या वर मालाची वाहतूक केली जाते.
सदर ओव्हरलोड कोळसा वाहतुकीमुळे रस्त्यांची एकदम दुरावस्था झालेली आहे. तसेच ही कोळसा वाहतूक रात्रीच्या वेळी होत असल्यामुळे रात्रीच्या वेळी लोकांना पण याचा बराच त्रास सहन करावा लागत आहे.
येत्या आठ दिवसात सदरची कोळसा वाहतूक क्षमतेच्या बाहेर केली गेली तर मनसे आरटीओ सिंधुदुर्ग ओरोस यांच्यासमोर ठिय्या आंदोलन करेल याची नोंद घ्यावी असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दोडामार्ग तालुका अध्यक्ष सुनिल गवस यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले व होणाऱ्या परिणामा संबंधित यंत्रणा जबाबदार राहील असे त्यांनी सांगितले आहे.