सावंतवाडी आगारातील कर्मचारी प्रतिनिधी अजित कदम यांचे उपोषण स्थगित
सावंतवाडी आगारातील कर्मचाऱ्याच्या रजा नियम बाह्य रितीने बिनपगारी केल्या होत्या त्याबाबत सावंतवाडी आगारातील कर्मचारी प्रतिनिधी श्री अजित कदम हे 26जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सावंतवाडी आगाराच्या समोर बेमुदत उपोषणाला बसले होते. आगार व्यवस्थापक हे उपोषणाची कोणतीही दखल घेत नव्हते. सर्व पक्षांचे लोक प्रतिनिधी तसेच कष्टकरी जनसंघाचे विभागीय पदाधिकारी या बाबत वारंवार बैठका घेवून तोडगा काढण्याचा प्रयत्न करत होते . सायंकाळ पर्यंत कोणताही तोडगा निघत नव्हता तेव्हा वरिष्ठ पातळीवरून जिल्हा पोलिस उपनिरीक्षक यांना पाचारण करण्यात आले तब्बल दोन तास चर्चा करून सायंकाळी आठ वाजता आगार व्यवस्थापक यांनी पंधरा दिवसांत टप्प्या टप्प्यात सर्व कर्मचार्यांची रजा मंजूर करून देत आहे असे लेखी स्वरुपात दिल्यानंतरच उपोषण मागे घेण्यात आले …