भ्रष्ट कारभाराच्या प्रकरणांवर कारवाईसाठी जिल्हा परिषद प्रशासनाला “मुहूर्त” मिळेना.
प्प्तनिधी सुनील आचरेकर
*सिंधुदुर्ग*
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील विविध खात्यांमध्ये भ्रष्ट कारभाराचे प्रकरण बाहेर येऊन चौकशीसाठी प्रलंबित आहेत तर काही प्रकरणांवर प्राथमिक चौकशी होऊन कारवाई साठी प्रलंबित आहेत मात्र सदरची प्रकरणे सदरच्या प्रकरणांवर चौकशीमध्ये दोषी आढळून देखील कारवाई का होत नाही याबाबत साशंकता उपस्थित होत आहे.जिल्हा परिषद मधील पदोन्नती वाटपाचा भ्रष्ट कारभार,देवगड पंचायत समिती शिक्षण विभाग घोटाळा,जिल्हा परिषद शिक्षण विभाग वॉटर प्यूरीफायर-टेलिव्हिजन खरेदी घोटाळा,अनुकंपा भरती घोटाळा,लाड पागे अशा प्रकरणांमध्ये चौकशी होऊन अनियमितांवर शिक्कामोर्तब होऊन देखील संबंधितांवर कारवाई होत नाही यामागे नेमके कसले हितसंबंध जोपासले जात आहेत खुलासा व्हावा. जिल्हा परिषदेतील लाड पागे प्रकरणी कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांना मनाप्रमाणे बदली मिळावी यासाठी मंत्रालयीन पातळीवरून हालचाली होतात यामागे आर्थिक उलाढाली होऊन जिल्हा परिषद प्रशासन दबावाला बळी पडत आहे का असा सवाल देखील उपस्थित होतो. या सर्व भ्रष्ट कारभाराला ग्रामविकास विभाग पाठीशी घालत आहे का असाही प्रश्न निर्माण होत आहे. भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी चौकशीसाठी देखील जिल्हा परिषद स्तरावर प्रलंबित असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी व कठोर कारवाईसाठी प्रशासनाला मुहूर्त सापडत नाही ही बाब क्लेशदायक असून भ्रष्टाचाराच्या या गंभीर प्रकरणांवर 31 डिसेंबर पूर्वी कारवाई न झाल्यास मनसे यासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाचा निषेध दर्शवण्यासाठी व या सर्व प्रकरणांवर तात्काळ कठोर कारवाईसाठी मुहूर्त मिळावा म्हणून जिल्हा परिषदेच्या सर्व खातेप्रमुखांना “पंचांग” भेट देईल असा सूचक इशारा मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.