Wednesday, August 12, 2026
Latest:
कोकण

बिगर परवाना बांधकामासाठी आकारण्यात आलेला दंड रद्द करण्यासाठी शासनाकडे पाठपुरवा करा

 

सावंतवाडी तालुक्यातील निवासी प्रयोजनासाठी बिगर परवाना बांधकामास आकारण्यात आलेला दंड अयोग्य आहे.ही बाब ध्यानात घेऊन हा दंड रद्द करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी मनसे नेमळे शाखाअध्यक्ष बाबुराव राऊळ यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या कडे केली आहे.श्री. राऊळ यांनी श्री. म्हात्रे यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन सादर केले आहे.

यावेळी उपस्थित सावंतवाडी तालुका अध्यक्ष गुरूदास गवंडे, मळगांव शाखा अध्यक्ष राकेश परब, सचिन मुळीक, राजन राऊळ आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!