सावंतवाडीत सुरु असलेल्या विकासकामांची संजू परब यांच्याकडून पाहणी
*सावंतवाडी ता.१९-:* नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या विकास कामांची माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी पाहणी केली. मिलाग्रिस हायस्कूल शेजारी तहसिलदार कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याच्या कामाची व गटार योजनेच्या कामाची पाहणी केली.
दरम्यान नगर परिषदेचे अधिकारी व ठेकेदार यांना कामाच्या दर्जाबाबत सूचना केल्या. यावेळी जिल्हा भाजपा युवा मोर्चा चिटणीस बंटी पुरोहित, सावंतवाडी शहर मंडल सरचिटणीस विनोद सावंत, उपाध्यक्ष अनिल सावंत, अथर्व सावंत आदी उपस्थित होते.

