एमटीडीसी च्या घोटाळ्याबाबत आम.केसरकर का गप्प??संजू परब
आ. दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत २ कोटी ७० लाख रूपये पक्ष प्रवेशासाठी मागितल्याचा आरोप केला. हा माणूस किती खोटारडा आहे हे सावंतवाडीचा जनतेला ठावूक आहे. मी यांच्याकडे गेलो नव्हतो, हे माझा दारावर आले होते. मी पैशाची मागणी केली असती तर, हे माझा दारावर का आले ? मला शिवसेनेत जायचं असतं तर मला केसरकरांची गरज नाही. एमटीडीसीचा माध्यमातून झालेल्या घोटाळ्याबद्दल दीपक केसरकर एक शब्द का बोलत नाही
? असा सवाल नगराध्यक्ष संजू परब यांनी केला.
तर एमटीडीसी भ्रष्टाचारातील ठेकेदार भेटीला पाठवतो असा मेसेज दोन दिवसांपूर्वी एका माणूसाकडून केसरकरांनी पाठवला असा गौप्यस्फोट केला. तर आ. नितेश राणे यांच्यावर टीका करण्याआधी तुमचा पुर्वजांनी जमिनी कशा घेतल्या या सांगायला लाऊ नका असा इशारा दिला. तर यापुढे तोंडून एक जरी शब्द निघाला तर पळता भुई थोडी करू असा नगराध्यक्ष संजू परब यांनी आ. दीपक केसरकर यांना दिला. तर मला पैशानं विकत घेण्याएवढा जन्माला आला नाही असं रोखठोक मत संजू परब यांनी व्यक्त केले.
यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.