कळसुलकरच्या एन.सी.सी.छात्र स्वरांगी खानोलकर (सिंधूकन्याची) प्रजासत्तकदिनी दिल्ली राजपथ येथे संचलनसाठी निवड
*कुमारी स्वरांगी संदीप खानोलकर सावंतवाडी* शहरातील नामांकित प्रशाळा *सावंतवाडी एज्युकेशन सो.संच.कळसुलकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय ची विद्यार्थिनी आहे.* ती इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेत असून तिला लहानपणापासून नृत्य आणि सैनिकी प्रशिक्षणाची आवड होती, तिने इयत्ता आठवी मध्ये असताना राष्ट्रीय छात्र सेनेच्या पथकात दाखल होण्याची तयारी केली व निवड प्रक्रियेत पास झाली. त्या अनुषंगाने कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या एनसीसी पथकामध्ये तिची निवड झाली. पुढे तिने *58 एनसीसी महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग नगरी ओरस* येथे गणतंत्र दिवस संचलन शिबिराच्या निवड चाचण्या पास केल्या, तदनंतर कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. पुढे तिने एक ना एक म्हणत सर्व टप्पे पार केले व अंतिम पुणे येथे पार पडलेल्या प्रीआर डी सी मध्ये आपले अव्वल स्थान राखत मुख्य गणतंत्र दिवस शिबिरामध्ये सहभागी होण्याचे स्वप्न साकारले. *पहिल्यांदाच महाराष्ट्र डायरेक्टरेट चे विद्यार्थीनी विमानाने हवाई वाहतुकीने दिल्ली येथे महाराष्ट्र सरकारच्या वतीने पाठवण्यात आले.* तोही मान स्वरांगीला मिळाला.
*सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातून पहिलीच विद्यार्थिनी सिंधूकन्या दिल्लीमध्ये होणाऱ्या संचलनात सहभागी होत आहे.* 58 एनसीसी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाल, प्रशासकीय अधिकारी अडम, ऑफिसर कर्नल निलेश पाथरकर यांच्या सहकार्याने, सुभेदार मेजर दिनेश गेडाम व फर्स्ट ऑफिसर गोपाळ गवस कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली हा पल्ला गाठण्यात स्वरांगीला यश प्राप्त झाले.
या सर्वांमध्ये सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष शैलेश पई सर्व संचालक मंडळ, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री दत्तप्रसाद गोठोस्कर, कळसुलकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय चे प्राचार्य नारायण मानकर सर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद, पालक वर्ग त्याचप्रमाणे स्वरांगीची आई सौ स्वप्नजा खानोलकर व वडील श्री संदीप खानोलकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

