२५ डिसेंबर ला सावंतवाडीत होणार वारकरी मेळावा
सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी सांप्रदाय सिंधुदुर्ग चे आयोजन
सावंतवाडी विठ्ठल मंदिर येथे सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी सांप्रदाय मार्गदर्शनाखाली सावंतवाडी तालुक्यातील वारकरी संप्रदायांची काल बैठक घेण्यात आली सदर सभेमध्ये सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील वारकरी बांध व सहभागी झाले त्यामध्ये २५/१२/२२ रोजी धनश्री मंगल कार्यालय येथे होणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा वार्षिक मेळाव्याचे नियोजन करण्यात आले सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी सांप्रदायाचे अध्यक्ष. ह भ प विश्वनाथ गावंढळकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व बरेच वारकरी उपस्थित होते
यामध्ये सकाळी वारकरी दिंडी, नंतर हरिपाठ, वारकरी मेळावा, दिनदर्शिका प्रकाशन व संतसेवा पुरस्कार प्रदान सोहळा असे कार्यक्रम होणार आहे सावंतवाडी शहरांमध्ये प्रथमच भव्य वारकरी मेळावा वारकऱ्यांचा होणार आहे तरी सर्व वारकरी बांधवांनी यामध्ये सहभागी व्हावे असे सावंतवाडी तालुका वारकरी संघटनेच्या वतीने आव्हान करण्यात आले.अशी माहिती युवा वारकरी केतन सावंत यांच्याकडून देण्यात आली आहे.

