दिव्यांगांसाठी मोफत जयपूर फूट, तळहात
दिव्यांगांसाठी मोफत जयपूर फूट, तळहात
सावंतवाडीत इनरव्हील क्लबतर्फे शिबीर
ओटवणे इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी यांच्यावतीने दिव्यांगांसाठी लवकरच मोफत जयपूर फूट आणि तळहात शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून या शिबिरासाठी गरजू दिव्यांगांनी नोंदणी करण्याचे आवाहन इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्यावतीने करण्यात आले आहे.
इनरव्हील क्लब हा सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेला क्लब आहे. गेल्या ४० वर्षांपासून या क्लबच्यावतीने सावंतवाडी शहर व तालुका परिसरात शैक्षणिक सामजिक आरोग्य आदी समाजपयोगी उपक्रम सातत्याने राबवित आहे. याच उपक्रमांतर्गत दिव्यांगांसाठी जयपूर फूट तसेच तळहाचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. यापूर्वीही २०१८ मध्ये अशाच प्रकारे
दिव्यांगांसाठी शिबिराचे आयोजन करून ३२ जणांना इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्यावतीने मोफत जयपूर फूटचे वितरण करण्यात आले होते. या शिबिरात जयपूर फूट सोबत ज्यांना गरज आहे. अशा दिव्यांगांना तळहातही मोफत देण्यात येणार आहे. या शिबिरासाठी गरजूंनी पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी दर्शना रासम ९४०४७७८१५१ आणि भारती देशमुख ८६६९३४७७०० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्या डॉ. शुभदा करमरकर यांनी केले आहे.

