माजगाव निवडणुकीत भाजपच्या सरपंच डॉ.अर्चना सावंत विजयी होण्यामागे सचिन बिर्जे चे लाभले मोठे सहकार्य
प्रभाग क्र.३ मधून दिले मोठे मताधिक्य
सावंतवाडी, दि.२४:-संपूर्ण जिल्ह्यात प्रतीष्ठीत मानली जाणारी ग्रामपंचायत म्हणून माजगाव चा उल्लेख केला जातो अनेक दिग्गजांचे डोळे माजगाव ग्रामपंचायत निवडणुकीत कोण जिंकते त्याकडे होते पण अखेर भारतीय जनता पार्टी च्या पारड्यात माजगाव ग्रामपंचायत गेली.निवडणूक निकालामध्ये प्रभाग क्रमांक १ मध्ये उद्धव ठाकरे गटाने बाजी मारून आपले खाते खोलले पण पण खर लक्षवेधी ठरला तो प्रभाग क्रमांक ३, कारण सरपंच पदासाठी रिंगणात असलेल्या अर्चना सावंत याना सर्वाधिक १९६ चे मताधिक्य याच मतदार संघातून मिळाले. कारण भारतीय जनता पार्टीचे माजगाव जिल्हा परिषद चे विभागीय अध्यक्ष सचिन बिर्जे सारखा खंदा कार्यकर्ता होता,त्यांचा असणारा जनसंपर्क व त्यांची स्वछ प्रतिमा हीच त्यांच्या फायद्याची ठरली .. भारतीय जनता पार्टी चे शक्ती केंद्र प्रमुख म्हणून त्यांनी गेली ३ वर्ष संघटना वाडीसाठी भरीव काम केले आहे तसेच सामाजिक क्षेत्रात एकता ग्रुप , सहयोग मंडळ ,मैत्री फाउंडेशन या सारख्या सामाजिक क्षेत्रात ही ते अग्रेसर आहेत त्यांच्या या कार्यची दखल अगदी वरिष्ठनेही घेतली असल्याचे समजते.माजगाव मध्ये एकहाती सत्ता मिळवण्यात सचिन बिर्जे यांचे मोठे योगदान लाभले, जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, माजी नगराध्यक्ष संजू परब,मनोज नाईक सावंतवाडी मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेशमा सावंत, महेश धुरी सर्वांनी सचिन यांचे अभिनंदन केले आहे.येणाऱ्या पुढील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत सचिन बिर्जे यांचा फायदा पक्षाला नक्कीच होईल यात मात्र शंका नाही..

