कोकणसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ला मधील जास्तीत जास्त ग्रामपंचायतीत युतीचे सरपंच विजयी होणार-अशोक दळवी

 

 

 

सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ला तालुक्याचा गावेगांव दौरा केला असता प्रत्येक गावांच्या ठिकाणी युतीचे सरपंच ग्रामपंचायत विराजमान होतील असे मत जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी व्यक्त केले .

 

युतीचे कार्यकर्ते घरोघरी फिरून शासनाच्या योजनाच्या माध्यमातून गावातील विकास कामे मूलभूत सुविधा केलेले काम या माध्यमातून मतदारसंघापर्यंत पोहोचून प्रचाराचा धडाका लावला आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नारायण राणे शिक्षण मंत्री दीपक केसरकर पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून केलेल्या ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा ग्रामपंचायतींना दिलेले सर्व अधिकार अनेक विकास कामे या विचाराला आणि ग्रामीण भागातून मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असून जिल्ह्यात तसेच सावंतवाडी मतदारसंघात युतीच्या माध्यमातून ‘थेट सरपंच व ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने निवडून येतील जेणेकरून युती शासन मजबूत होईल मतदार हे युतीच्याच उमेदवारांना निवडून देतील अशी खात्री बाळासाहेबांचे शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!