क्रीडामनोरंजनशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

भोसले पॉलिटेक्निक येथे राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा…

 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांचे आयोजन….

सावंतवाडी, दि.२४:-यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक येथे १९ वर्षांखालील राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन आज करण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच देशाचे माजी ऑलिंपिकवीर पै. खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा कॅरम असोसिएशनचे सचिव योगेश फणसळकर, सचिव सचिन घाडी, राष्ट्रीय पंच अमेय पेडणेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, मनीषा पाटील, उत्तमेश्वर लाड, प्राचार्य गजानन भोसले आदी
उपस्थित होते.ही स्पर्धा दोन दिवस चालणार असून राज्याच्या पाचही विभागांचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू यामध्ये सहभागी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!