कुडाळशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

कुडाळ पोलिस स्थानक ते आरएसएन हॉटेल रस्ता तातडीने दुरुस्त करा..

▪️शिवप्रेमी सिंधुदुर्ग चे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.१०: पोलिस स्थानक ते आर.एस.एन हॉटेल रस्ता हा वाहन चालकांसाठी तीव्र डोकेदुखी ठरत आहे. तांत्रिक निकष पूर्ण करुन रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु करावे. तसेच ज्याठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत, ते तातडीने बुजवावे. जर येत्या २ दिवसात खड्डे बुजवले नाही, तर शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने नाईलाजाने खड्डे भरा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने निवेदनाच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम खात्याला देण्यात आला.

सदर रस्त्याचे काम हे तांत्रिकदृष्ट्या अडकले आहे. खडीकरण केल्यानंतर रस्त्यावर डांबराचा थर न बसवल्याने बऱ्याच ठिकाणी खडी उखडून खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी खड्डे एवढे मोठे आहेत की तेथे अपघात होऊन जिवीतहानी होऊ शकते. कुणा निष्पाप नागरीकाचा नाहक जीव गेल्यास त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न लोकांच्या मनात आहे.

सदर रस्त्यावरुन प्रवास करताना रुग्ण, वृद्ध नागरीक, वाहन चालक यांना त्रास होत असल्याने लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशा इशारा शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला.

यावेळी राजू दळवी, भुपेंद्र उर्फ बंड्या पारकर, नागेश नार्वेकर, अनिश सावंत, पुष्कराज तवटे, सर्वेश पावसकर, राज भेंडे, अक्षय जोशी, वसीम शेख, हर्षल पार्सेकर, रमाकांत नाईक, दैवेश रेडकर आदी शिवप्रेमी उपस्थित होते.

*_🔥फ्री होम डिलिव्हरी ती ही फक्त सावंतवाडी शहरापुरती मर्यादित..🔥_*

*🍝 शिवन्या फास्टफूड 🍜*
कोविड-19 च्या काळात आमच्या सर्व ग्राहकांसाठी सावंतवाडीत आम्ही पुन्हा एकदा सुरू करीत आहोत. *फ्री होम डिलिव्हरी* सुविधा आणि ती ही पूर्णपणे सुरक्षित..

🍢गोबी मंचुरी        ₹25/-
🥘फ्लॉवर चिल्ली   ₹40/-
🥟स्टीम मोमो        ₹20/-

*_🤷🏻‍♂️खायला येणार कुठे? त्यासाठी आमचा पत्ता आहे,_*
हॉटेल मँगो 1 समोर, सावंतवाडी..

*_🙋🏼‍♂️मग वाट कसली पाहताय! उचला फोन आणि करा कॉल.._*
*_📱9404931801_*
*_📱9146144203_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!