सिंधुदुर्गात अधिकृत वाळू लिलाव प्रकिया राबवा; ‘मनसे’चे लक्षवेधी धरणे आंदोलन
▪️महसूल अधिकारी व वाळूमाफियांच्या अर्थपूर्ण साटेलोट्यांमुळे जिल्ह्याचा करोडोंचा महसूल बुडाला..
▪️शिवाय; पर्यावरणसृष्टीची हानी झाल्याचा मनसेचा आरोप..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.१०: जिल्ह्यात वाळूच्या भरमसाठ दर वाढीमुळे बांधकाम व्यवसाय ठप्प अवस्थेत आहेत. ज्याचा थेट परिणाम बांधकाम कामगारांच्या रोजी-रोटी वर होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाचा महसूल बुडवून चोरटी वाळू गोवा राज्यात विकली जात असल्याने सिंधुदुर्ग मनसे आक्रमक झाली आहे. एकीकडे वाळूमाफिया व भ्रष्ट अधिकारी, तलाठी व मंडळ तलाठी आधिकारी यांच्या संगनमताने जिल्ह्यातील वाळूचा दिवसाढवळ्या गोवा राज्यात पुरवठा होतोय, तर दुसरीकडे जिल्ह्यातील जनतेला चोरट्या वाळूचे दर परवडत नसल्याने घर बांधकाम थांबली आहेत. जिल्ह्यातील बांधकाम व्यवसाय रेंगाळला असून ज्याचा फटका बांधकाम कामगारांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. देवली, आंबेरी, चिपी, कवठी, कालावल खाडी आदी क्षेत्रात होणाऱ्या अवैध वाळू उपशाची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्ह्यातील अवैध वाळू उपशावर प्रतिबंध घालुन अधिकृत वाळूची लिलाव प्रक्रिया राबवून जिल्ह्यातील जनतेला अल्प दरात वाळू पुरवठा व्हावा या मागणींसाठी मंगळवार दि.१० नोव्हेंबर २०२० रोजी जिल्हाधिकारी कार्यलयासमोर लक्षवेधी धरणे आंदोलन माजी आमदार जीजी उपरकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
याबाबत निवासी जिल्ह्याधिकारी, खनिकर्म आधिकारी व मनसे शिष्टमंडळ यांच्यात चर्चा होऊन कठोर कारवाई करण्याची ग्वाही महसूल प्रशासनाने दिली.
पूल परिसरात वाळू उत्खनन होत असल्याने पुलाला धोका निर्माण झालेला आहेत, तर काही ठिकाणी खार बंधाऱ्यांची धुप होत आहे. प्रशासन रॅम्प तोडीची कारवाई करते. मात्र, बेकायदेशीर होड्या आणि पर राज्यातील बेकायदेशीर वास्तव्य करणारे स्थलांतरित कामगार यांच्यावर कारवाई करत नाही. यामुळे वाळूमाफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. खाडी परिसरातील पारंपरिक रहिवाशांना सी आर झेड चे निर्बांध लावले जातात. मात्र, वाळूचे अवैध रॅम्प बांधकाम टलाठ्यांच्या डोळ्यांदेखत केले जाते. प्रशासन कारवाई करत नसल्यास मनसे कायदा हातात घेईल तसेच वेळीच कठोर कारवाई न झाल्यास मनसे मोर्चा काढून या भ्रष्ट यंत्रणेला जाब विचारील असा इशारा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिला.
या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे करायचे काय खाली डोके वर पाय, वाळू आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, एकदाच घुसणार मनसेच दिसणार अशा घोषणांनी मनसेने परिसर दणादुून सोडला.
यावेळी मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, दया मेस्त्री, सचिन तावडे, दत्ताराम बिडवाडकर, कुणाल किनळेकर, राजेश टंगसाळी, बाबल गावडे, विनोद सांडव, आपा मांजरेकर, गुरू गवंडे, चंदन मेस्त्री, बाळा पावसकर, बाळकृष्ण ठाकूर, आशिष सुभेदार, सचिन ठाकूर, अविनाश अणावकर, अमित इब्राहिमपूरकर यासंह असंख्य पदाधिकारी तसेच असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. तसेच आंबेरी, देवली परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
*_🔥महाबचत..😍 महाबचत..😍 महाबचत..🔥_*
आता *ऑनलाईन🌎* पेक्षाही *स्वस्त दरात💰* सर्व *नामांकित💫* कंपन्यांचे *स्मार्टफोन📲* खरेदी करा…! *सावंतवाडीतचं🌴* आणि सोबत मिळावा *नवरात्री🛕* स्पेशल *खास🤩* भेटवस्तू….!🎁😍💃
*📲 म्युझिक कॉर्नर 🎧*
*🎤 सावंतवाडी 🎼*
_ग्राहकांसाठी_ *नवरात्री💃, दसरा☘️* _आणि_ *दिवाळीच्या🪔* _मुहूर्तावर घेऊन आले आहेत…!_ *स्मार्टफोन📱* _तसेच_ *एलईडी टीव्ही🖥️* _खरेदीवर_ *विशेष🎊* _सूट…! सोबत_ *BAJAJ FINANCE⚡* _आणि_ *SAMSUNG✨ SURE FINANCE* _तेही_ *0%💫* _व्याजदरासह…!_🤩
*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्टफोन:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️iPhone ▪️realme
▪️VIVO ▪️OPPO
▪️ONEPLUS
_तसेच_
*♦️आमच्या येथे Aiwa कंपनीच्या LED TV उपलब्ध:-*
▪️ *24″* एलईडी टीव्ही फक्त *6,500/-*
▪️ *32″* रेग्युलर फक्त *8,990/-*
▪️ *32″* स्मार्ट फक्त *10,990/-*
▪️ *32″* अँड्रॉइड + स्मार्ट फक्त *11,990/-*
▪️ *40″* स्मार्ट फक्त *14,990/-*
▪️ *43″* स्मार्ट फक्त *18,990/-*
▪️ *50″* स्मार्ट फक्त *24,990/-*
▪️ *55″* स्मार्ट फक्त *29,990/-*
_तसेच_
*👉 सर्व कंपन्यांचे LED टीव्ही होलसेल दरात व सुलभ हप्त्यामध्ये उपलब्ध…*
*👉 SMART TV Starts from…….Rs.10,990*
*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️Haier ▪️SONY
▪️Panasonic
_तसेच_
*👉 सर्व प्रकारच्या मोबाईल अँसेसरीजवर 40% पेक्षाही जास्त भरगोस सूट…*
*🏠आमचा पत्ता :* विठ्ठल मंदिर रोड -जयप्रकाश चौक,सावंतवाडी
*📲संपर्क : 7719918722*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

