मनोरंजनरत्नागिरीराजकीयसामाजिक

काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत यादव यांच्या कडून चिपळूणची सुकन्या अभिनेत्री ऐश्वर्या नागेश चा सन्मान..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,दि.०९: चिपळूणची सुकन्या ऐश्वर्या नागेश हिने झी मराठीवरील देव माणूस या मालिकेत अपर्णाची भूमिका कसदारपणे साकारली आहे. तिच्या अभिनयाचे कौतुक काँग्रेसच्या वतीने करण्यात आले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी तिला या क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

यावेळी शहराध्यक्ष रतन पवार, युवा कार्यकर्ते फैसल पिल्पीले यांच्यासह ऐश्वर्याचे आई-वडील उपस्थित होते.

झी मराठी वाहिनीवर सुरु असलेल्या ‘देव माणूस’ या मालिकेतून चिपळूणची सुकन्या, ऐश्वर्या अरुणा प्रकाश नागेश प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिने या मालिकेत डॉक्टरच्या आयुष्यात येणारी नवीन व्यक्ती हे पात्र साकारले असून अपर्णा हे तिच्या भूमिकेचे नाव आहे. दिनांक ८ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजता तिचा पहिला एपिसोड प्रदर्शित झाला.

आर.सी. काळे विद्यालायात तिचे शालेय शिक्षण पूर्ण झाले असून डी.बी.जे. महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी असलेल्या ऐश्वर्या नागेश हिने महाविद्यालयीन स्तरावरील एकांकिका तसेच मॉडेलिंग अशा विविध स्पर्धांमधून स्वतःला सिद्ध केले आहे. तिने वक्तृत्व, कथाकथन, चित्रकला, रांगोळी, अभिनय अशा विविध स्पर्धांमध्ये आजवर यश मिळवले आहे. एस.टी. महामंडळातील निवृत्त वाहतूक निरीक्षक प्रकाश नागेश यांची ती कन्या आहे. सध्या ती ए.एल.एस.जे. कॉलेज, कुर्ला येथे मास मीडियाचे शिक्षण घेत आहे. शाळेत असताना तिने सर्वोत्तम मानला जाणारा चतुरंगचा विद्यार्थी गोडबोले पुरस्कार मिळविला होता. यापूर्वी तिने अनेक एकांकिका, शॉर्ट फिल्ममधून अभिनय केला आहे. तसेच सह्याद्रीवरील ‘भ्रमंती महाराष्ट्राची’ या कार्यक्रमातही तिने निवेदन केले आहे. अनेक फॅशन शो जिंकले आहेत. ‘असंही घडू शकतं’ हे नाटकही तिने केले असून आता ती झी मराठीवरील ‘देव माणूस’ या मालिकेतून दिसत आहे. आपल्या यशामध्ये आई-वडिलांचा मोठा वाटा असल्याचे ऐश्वर्याने सत्कारावेळी सांगितले.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!