गोव्यातून आलेल्या पर्यटकाचा आंबोलीत हृदयविकाराने मृत्यू
गोव्यातून आलेल्या पर्यटकाचा आंबोलीत हृदयविकाराने मृत्यू
मृत मिरजेचा; धबधब्याजवळ आली चक्कर
प्रतिनिधी -: आंबोली
गोव्यातून माघारी परतत असताना हृदयविकाराच्या झटक्याने एका पर्यटकाचा वाटेतच मृत्यू झाला.. अनिकेत अशोक दुधाळ (वय २६, रा. बामणोली, ता. मिरज, जि. सांगली), असे त्याचे नाव आहे. ही घटना आंबोली धबधबा परिसराजवळ रविवारी (ता. ३०) सायंकाळी घडली.
अधिक माहिती अशी की :
अनिकेत व त्याचे तीन मित्र गोव्यात पर्यटनासाठी गेले होते. गोव्यात फिरून झाल्यावर ते काल माघारी परतत होते. दरम्यान, ते आंबोली
धबधबा परिसराजवळ पोहचले असता अनिकेतला अचानक चक्कर आली. त्याच्या मित्रांनी त्याला तातडीने आंबोली आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉ. महेश जाधव आणि आदिती पाटकर यांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. याच दरम्यान त्याला तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. याची माहिती नातेवाइकांना देण्यात आली. आज नातेवाईक व मित्र परिवार दाखल झाले. आंबोली पोलिस हवालदार दत्ता देसाई आणि दीपक शिंदे यांनी पंचनामा करून विच्छेदन करण्यात आले.