बांद्यात शाळकरी मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न.
बांद्यात शाळकरी मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न.
बांदा:प्रतिनिधी:शैलेश गवस
बांदा शहरातील निमजगा प्राथमिक शाळेच्या तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला वाफोली रस्त्यावर दुचाकीने आलेल्या दोन इसमानी चॉकलेटचे आमिष दाखवून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलाने प्रसंगवधान दाखवत मुलाने संशयितच्या हाताचा चावा घेऊन आपली सोडवणूक केली. सकाळी साडेदहा वाजता भर वस्तीत हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सरपंच अक्रम खान व ग्रामस्थांनी याठिकाणी धाव घेत संशयितना शोधण्याचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षक शामराव काळे, उपनिरीक्षक समीर भोसले यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. संबंधित विद्यार्थ्याने आपल्यासोबत २ दिवसात दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्याचे सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरसकर, जावेद खतीब, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, साहिल कल्याणकर, खेमराज शाळेचे पर्यवेक्षक नंदू नाईक, तोरसे माजी सरपंच बबन डिसोझा यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.