क्राइमशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

कोकण लाईव्ह च्या दणक्याने पोलिस प्रशासन जागे..

▪️सावंतवाडीत एक लाख सव्वीस हजाराची दारू जप्त..

▪️उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके यांनी घेतला पुढाकार..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.२३: सावंतवाडीच्या नवीन महीला पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. रोहीणी सोळंके यांनी गोवा बनावटी दारूच्या विरोधात आज पहीला हातोडा उगारत दारू जप्त केली. सावंतवाडी तालुक्यात राजरोसपणे सुरु असलेल्या अवैध धंद्यांना लगाम घालण्यासाठी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल ने मोहिम उघडली होती. आता दस्तुरखुद्द उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके यांनी पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर बांदा येथून सावंतवाडीच्या दिशेने अल्टो कार मधून अवैधरित्या गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या इसमास पोलिसांनी ताब्यात घेतले. पुष्पसेन दत्तात्रय सावंत (३०, रा. माजगाव कुंभारवाडा) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून गोवा बनावटीची १ लाख २६ हजार ७२० रुपयांच्या दारूसह एकूण २ लाख २६ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. डॉ. रोहिणी सोळंके यांच्यासह पोलिसांनी बांदा सावंतवाडी असा थरारक पाठलाग करत माजगाव येथे त्याला ताब्यात घेण्यात आले. यावेळी हवालदार जगदीश दुधवडकर, सचिन कोयंडे, अमित सावंत, रामा चव्‍हाण विनय पास्ते आदींनी या कारवाईत सहभाग घेतला होता.

*_💥साजरी करा ही नवरात्री आणि दसरा उत्सव महाराष्ट्रातील नं.१ मोबाईल चैन SS ‘मोबाईल्स’च्या ‘दसरा ऑफर्स’ सोबत..💥_*

🔥ऑफर फक्त २१ ते २५ ऑक्टोबर पर्यंत..

*💫स्मार्ट फोन्सच्या खरेदी वर चक्क २९९९ रु. पर्यंतची हमखास भेट वस्तू..*
*💫स्मार्ट फोन्स वर चक्क ४० टक्के पर्यंत सूट..*
*💫ब्रँडेड ऍक्सेसरीज वर मिळवा आकर्षक सूट..*
*💫चक्क १० मिनटात लोन वरती फोन..*
*💫स्मार्ट टि.व्ही. फक्त ११९९० रु. पासून..*

🔥तर मग वाट कसली पाहताय! आजच भेट द्या आपल्या 💁🏻‍♂️ *SS COMMUNICATION स्टोअरला..*
*🌐www.ssmobile.com*

*🌈शाखा : सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, चिपळूण, रत्नागिरी..*

*🏬Address :* Mudra Commercial Hub, Uchale Compound, Mumbai-Goa road, Kankavali.
*📱Mobile : 7030934427*

*🏬Address :* Patil Towers, Gavali Tittha, Near S.T Stand, Sawantwadi.
*📱Mobile : 7066755656*

*🏬Address :* Shop No, 4, Chintamani Plaza, Near Police Station, Kudal.
*📱Mobile : 8956931120*

*📱Head 0ffice : 8600666111*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!