गांजा प्रकरणाच्या मुळाशी जायला जाबाज अधिकाऱ्याची गरज*
*🛑*प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणारे अधिकारी ,गांजा प्रकरणांचा तपास करू शकणार नाहीत*
*🛑*अल्पावधीत कोट्याधिश झालेल्या शपिक शेमन चे रहस्य उलगडणार*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ संपादकीय:-सीताराम गावडे*
*🎴सावंतवाडी,दि,:-२५*
पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज, सद्गुरु साटम महाराज ,भारती महाराज, यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सावंतवाडी शहराला एक वेगळा वारसा आहे,या सावंतवाडी संस्थानला महात्मा गांधी यांनी राम राज्य असे म्हटले होते, शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या सावंतवाडी शहराने अनेक नररत्न जन्माला घातली, या शहरात विचारांची लढाई विचारांनी लढली जात होती, सुसंस्कृत माणसे या शहरात राहतात असे आम्ही छातीठोकपणे सांगायचोत,मात्र अलिकडच्या पाच-सात वर्षात हे सर्व चित्र बदलत चाललंय ,परप्रांतीयांनी या शहराला गिळंकृत करण्याचा घाट घातला आहे, रस्त्यावर कटलरी वस्तू विकणारे हे परप्रांतीय अल्पावधीत अब्जाधीश कसे झालेत, याबाबत आम्ही वारंवार लिखान केले, शफिक शेमन सारखी माणसे अल्पावधीत कोट्याधीश कशी होतात ,याची चौकशी करा अशी आम्ही मागणी केली, वारंवार यावर लिखाण करत असताना आम्हाला कटकारस्थाने रचून अडकवण्याचा ही प्रयत्न झाला मात्र श्रीदेव पाटेकरच्या या पवित्र भूमीत ते घडू शकले नाही, आम्ही दुप्पट ताकदीने याच मातीत घट्ट पाय रोवून उभे राहिलोत ते फक्त आणि फक्त श्री पाटेकर , उपरलकर व माझ्या कुलदेवतेच्या आशीर्वादाने.
आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो या शहरात गांजा, चरस यासारखे अमली पदार्थ विकले जातात ,त्याचे भले मोठे रॅकेट या शहरात कार्यरत आहे, आमचे मित्र सुनील पेडणेकर यांनीही याबाबत आपल्या सदरातून वारंवार आवाज उठवला मात्र त्यांचा आवाज दाबण्याचे काम काही समाजविघातक प्रवृत्तीने केले मात्र त्याला ते जुमानले नाहीत,आम्हालाही दाबण्याचे काम करण्यात आले, मात्र त्याचा आमच्यावर काडीमात्र परिणाम झाला नाही व आज खरे काय ते अखेर बाहेर पडलेच.
अठरा ,एकोणीस वर्षाची उच्चभ्रू वस्तीतील मुले ज्यावेळी अशा कृत्यात अडकली जातात तेव्हा शरमेने मान खाली जाते, ज्या आई-वडिलांनी मोठ्या अपेक्षेने मुलांना लहानाचे मोठे केले, शिकवले, तीच मुले क्षणिक सुखासाठी नितीन भ्रष्ट होतात ,नको त्या कृत्यात अडतात तेव्हा आई-वडिलांना ही जगून मेल्याल्यासारखेच आहे.
सावंतवाडी शहरात गेल्या दहा वर्षापासून बरेचशे गांजाचे प्रकार उघडकीस येऊ लागले आहेत, याबाबत स्थानिक नगरसेविका अनारोजीन लोबो यांनीही मध्यंतरीच्या काळात आवाज उठवला होता ,मात्र प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणारे प्रशासनातील अधिकारी जोपर्यंत या जिल्ह्यात आहे आहे तोपर्यंत या जिल्ह्यात असे प्रकार होतच राहणार व अशी प्रवृत्ती या जिल्ह्यातून ज्या वेळु हद्दपार होणार त्याच वेळी हे प्रकार बंद होतील याची मला खात्री आहे. कारण ज्या ठिकाणी कुंपणच शेत खाते त्याठिकाणी सर्वसामान्य जनता तरी काय करणार, अशा मुलांना पकडायचे ,त्यांच्याकडून काही रक्कम उकळायची व त्यांना सोडून द्यायचे असे प्रकार सर्रास घडू लागले आहेत.
मुळात हा गांजा आला कुठून? त्यांना पुरवठा करणारा कोण? याचा शोध पोलीस का घेत नाहीत?फक्त पकडलेल्या आरोपिंची कोठडी मागायची त्यांचा दोन चार दिवस पाहुणचार करायचा,तो न्यायालयिन कोठडीत गेल्यावर जामिनावर सुटून पुन्हा तोच धंदा करायला मोकळा हे कुठेतरी थांबले पाहिजे, मात्र ज्या एकोणीस वर्षाच्या मुलांना या गुन्ह्यात अटक केली आहे त्या मुलांकडे हा गांजा आला कुठून ?कोणी पुरवठा केला? याचा पोलीस तपास का करत नाही?हा यक्ष प्रश्न आमच्यासमोर उभा आहे, सुरुवातीपासूनच अल्पावधीत श्रीमंत झालेल्या परप्रांतीयांची चौकशी करा, सफेद कपडे घालून जे हे काळे धंदे करतात त्याचा शोध घ्या ,अशी मागणी आम्ही वारंवार केली होती,जर या गांजा प्रकरणाच्या मुळाशी जायचे असेल तर त्या बेग या युवकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सर्व माहिती घेतली तर सत्य उघडकीस येईल.
आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार सावंतवाडी शहरात जवळपास ४०जणांचे हे रॅकेट आहे यामध्ये वीस ते पंचवीस वर्षाची तीस मुले व १९ ते २० वर्षाच्या आतील दहा मुले आहेत त्यामुळे पोलिसांनी याच्या मुळाशी जाणे अत्यंत गरजेचे आहे असे आमचे मत आहे
या पोरांचा घोळका सोबत काही मुलिही, माधवभाटले अंडाकृती तलाव, तहसीलदार निवास पाठीमागचा परिसर, नरेंद्र डोंगर,चिवार टेकडी,परिसरात हमखास पाहायला मिळतो, पोलिसांनी याठिकाणी अचानक धाड टाकल्याह मुद्देमालासह काही मुले निश्चितच मिळतील याचा आम्हाला विश्वास आहे व या पडद्या मागे असणारा व अल्पावधीतच आब्जाधिश झालेला पांढरे कपडे काळा गाॅगल लावणारा नापीक म्हणा की शपीक म्हणा, शेमन चा पडदा फार्श होईल हे निश्चित मात्र त्यासाठी प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणारे अधिकारी असून उपयोग नाही त्यासाठी एखाद्या जाबाज अधिकाऱ्याची गरज आहे.तरच या गांजा प्रकरणाच्या मुळाशी पोहचणे शक्य होईल.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*_प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…_*
_इंजिनिअरींगला अँडमिशन सुवर्ण संधी….. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्था *यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक,चराठे, सावंतवाडी*_
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव NBA मानांकनप्राप्त कोर्सेस उपलब्ध असलेले पॉलिटेक्निक
*★ISTE नवी दिल्ली यांनी गौरविलेले सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक*
*★(10 वी, 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्याना इंजिनिअरींगला प्रवेश संधी*
*★SC, ST, NT, SBC विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण*
*★OPEN & OBC विद्यार्थ्यांना फी मध्ये 50 % सवलत*
*★कुठलीही प्रवेश परीक्षा नाही NO CET*
*★400 + विद्यार्थ्यांची नामांकीत कंपनीमध्ये नियुक्ती*
*•उपलब्ध अभ्यासक्रम•*
●सिव्हिल इंजीनिअरिंग ●मेकॅनिकल इंजिनिअरिंग ●इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ●कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
*👨🏻🎓💯 % नोकरीची हमी 👩🏻🎓*
*🔸आमची वैशिष्ट्ये:-*
▪️सुसज्ज इमारत ▪️दर्जेदार शिक्षण
▪️अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग
▪️अद्ययावत ग्रंथालय▪️वर्कशॉप
▪️खेळाचे मैदान ▪️व्यायामशाळा
▪️सर्वसुविधायुक्त वसतिगृह ▪️बस सुविधा
▪️२४ तास सुरक्षारक्षक ▪️कॅन्टीन
*🎴संपर्क*
📞02363273535
📞02363273456
📱9421718850
📱9130003477
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*