जिल्ह्यात राजरोस मटका, जुगार,ऑनलाइन जुगार, सोशल क्लबच्या माध्यमातून जुगार, सुरू असताना पोलीस यंत्रणा सुशेगाद
*_🛑 जिल्ह्यात राजरोस मटका, जुगार,ऑनलाइन जुगार, सोशल क्लबच्या माध्यमातून जुगार, सुरू असताना पोलीस यंत्रणा सुशेगाद*
*🛑पर्यटकाना आरोपी करून सिंधुदुर्ग पोलिस काय साध्य करणार,*
*🛑पोलिसांच्या अशा कृतीमुळे जिल्ह्यातील पर्यटन वाढीस ब्रेक*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ संपादकीय:-सीताराम गावडे*
*🎴सावंतवाडी,दि,:-३० नोव्हेंबर*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी मटका, जुगार ,ऑनलाइन जुगार, सोशल क्लब च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जुगार चालत असून जिल्ह्यातील युवा पिढी बरबाद होत असताना राजकीय नेते मंडळी मात्र प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार करीत आहेत,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस याकडे लक्ष न देता छोट्या-मोठ्या हाॅटेल व्यावसायिकांना या ना त्या कारणावरून त्रास देण्याचा प्रकार करत असल्याने या विरुद्ध प्रचंड संताप जनमानसात उठत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात चरस, गांजा, अफू ,यासारख्या अंमली पदार्थांची राजरोस विक्री होत असताना जिल्ह्यातील यंत्रणा मात्र सुशेगाद आहे, तीन किलो गांजा शेख नावाच्या व्यक्तीकडे गांजा मिळूनही त्याला तीन दिवसात जामीन दिला जातो व १३ ग्रॅम गांजा मिळणारा मुंबईतील एक व्यक्ती सहा महिने जेलमध्ये सडतो याचा अर्थ काय? पोलिसांनी अमली पदार्थांच्या बाबतीत सखोल चौकशी करणे गरजेचे असताना ते प्रकरण अर्धवट सोडून दिल्याने व पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव नसल्याने हम करे सो कायदा अशा प्रकारचे वर्तन जिल्ह्यातील पोलीस करू लागले आहेत.
यामुळे जिल्ह्यातील युवा पिढी बरबाद होण्याच्या मार्गावर आहे, आज गल्लो,गल्ली खेडो-पाडी मटका, दारू ,जुगार, गांजा, यासारख्या अमली पदार्थ सहज उपलब्ध होऊ लागले आहेत.
गोव्याहून सिंधुदुर्गात लाखो रुपयांची अवैध दारू वाहतूक होत असताना लाठीवरील पोलीस मात्र झोपा काढत असतात, सिंधुदुर्ग पोलिसांच्या अनेक लाठी असताना त्याठिकाणाहून अवैध वाहतूक करणारी गाडी जातेच कशी याचा जाब पोलीस प्रमुखांनी आपल्या पोलिसांना विचारणे गरजेचे आहे, पण सर्वच आळी मिळी गुपचिळी त्यामुळे दारू मटका जुगार अमली पदार्थांचे सेवन हे प्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढीस लागले आहेत. सावंतवाडी शहर, कुडाळ ,कणकवली ,मालवण, वैभववाडी, देवगड ,दोडामार्ग ,बांदा, या शहरात अवैद्य वस्तूंची विक्री राजरोस पणे केली जाते ,अवैध धंदा करणारे कोण आहेत हे स्थानिक पोलिसांना चांगल्या प्रकारे माहीत असताना देखील त्याकडे अधिकारी कानाडोळा करीत आहे त्यामुळे दिवसेंदिवस हे प्रकार वाढीस लागले आहेत.
रस्त्यावर बसून कटलरी विकणारे शफिक शेमन सारखी माणसे काही वर्षातच करोडपती झाली आहेत, गुजरात मार्गे सिंधुदुर्गात येणाऱ्या प्रत्येक व्यापाऱ्याची चौकशी झाली असती तर यातील खरे सत्य बाहेर पडले असते, मात्र मी वारंवार याबाबत लिहूनही आश्वासन देण्यापलिकडे याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही व कोणत्याच पक्षाच्या नेत्यांना याबाबत काही देणे घेणे नाही हीच खरी शोकांतिका आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*
*🍦नित्या एजन्सी🍦*
भटवाडी ता.सावंतवाडी
*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*
*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*
*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*
*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*
प्रोप्रा.अनिल-9011183285
सुनील-7709280101
रुपेश-9307046211
रवी जाधव-9405264027
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*