दिपक केसरकर हे फालतू पोपट पंची करीत आहेत -खासदार विनायक राऊत
दिपक केसरकर हे फालतू पोपट पंची करीत आहेत -खासदार विनायक राऊत
सावंतवाडी, दि २९: आमदार तथा शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्रीदीपक केसरकर हे फालतू पोपटपंची करत आहेत. त्यांच्या वक्तव्यांकडे आम्ही लक्ष देत नाही, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केली. दरम्यान शिंदे गटाकडून शिवसेना पूर्णतः गुंडाळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच ते शिवसेनेच्या प्रत्येक गोष्टीवर आपला अधिकार सांगत आहेत. मात्र मुंबईत होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर कोणीही कितीही दावा केला. तरी तो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालीच होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. कोलगाव येथील बीएसएनएल टॉवरच्या शुभारंभासाठी श्री. राऊत हे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, बाळा गावडे, योगेश नाईक, अपर्णा कोठावळे, गुणाजी गावडे, मेघश्याम काजरेकर आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री. राऊत पुढे म्हणाले, शिंदे गट केवळ आमदार आणि खासदारांना फोडून गप्प बसला नाही. तर त्यांनी पूर्ण शिवसेना गुंडाळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेनेच्या अनेक गोष्टीवर त्यांनी आपला दावा केला आहे. यात मुंबईत होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी सुद्धा त्यांनी परवानगी मागितली आहे.