कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सोनुर्ली माऊली मंदिर चोरीचा तपास गुन्हा अन्वेषण शाखेकडे- मंत्री दीपक केसरकर.

सावंतवाडी,दि.२६ ऑगस्ट (प्रतिनिधी)
सोनुर्ली येथील श्री देवी माऊली मंदीरात शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्यासह भेट दिली यावेळी त्यांनी मंदिरातील चोरीचा तपास क्राइम ब्रॅचकडे सोपविण्यात येत असून पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांची टिम तपास करणार आहे असे ते म्हणाले.

सोनुर्ली येथील श्री देवी माऊली मंदीरात शालेय शिक्षण पर्यावरण मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दर्शन घेतले यावेळी पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर,तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी व्ही एम नाईक,अशोक दळवी, नारायण राणे, गजानन नाटेकर, शंकर गावकर, राजेंद्र गावकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर म्हणाले, क्राईम ब्रॅच कडे तपास सोपविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संदीप भोसले तपास करीत आहेत. माऊलींचे चोरी झालेले सर्व दागिने मिळतील तेव्हाच माझा सत्कार झाला आहे असे मानेन. वस्तूंच्या किंमती पेक्षा भावनांना महत्त्व आहे.

पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी देखील विश्वास व्यक्त केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!