राजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

पोकळ विकासाचे अँटमबाँम्ब फोडणारे सत्ताधारी अवैध व्यवसाय का बंद करीत नाहीत; माजी नगरसेवक सुनील पेडणेकर

▪️गुरगुरणारे राजकीय वाघ केवळ जिल्ह्यात डरकाळ्या फोडून मुंबईला जाऊन अलिशान जीवन जगतात!

▪️निष्पाप गौंडस मुलांचे त्यांच्या आयांचे दारु गुटख्यामुळे कुटुंब उध्वंस्त झाल्याने गावागावातून घराघरातून येणारे आक्रोश का यांना एकू येत नाहीत!

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.०५: जो तो राजकीय नेता जिल्ह्यात येतो एकमेकांवर कुरघोडी करुन डरकाळ्या फोडतोय, पोकळ विकासाचे अँटमबाँम्ब फोडणाऱ्यांचा शाश्वत विकास कधीच दिसला तर नाहीच! शिवाय करोडो रुपये जिल्ह्यात आले आणि पहील्याच पावसात वाहून देखील गेले. याची साधी चौकशी नाही ना, कुणावर कारवाई! मात्र, भेसळ दारु, गुटखा, अमली पदार्थाच्या सेवनामुळे गावागावात घराघरात अल्पवयातच माणसे मारली जातात, त्यांची बायका मुले वयोवृध्द आई-वडील आक्रोश करतात, त्यांचा कानढळ्या बसणारा आक्रोश सात्वंन करण्यास गेलेल्या या राजकीय नेत्यांना कधी एकू येणार असा सवाल माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांनी केला आहे.

भेसळ दारु, गुटखा, अमली पदार्थ आणि फूड पाँयझनने माणसे मारायची आणि जिल्ह्यातील दारीद्ररेषा, निराधार अनाथ दिव्यांगांची संख्या वाढवून पोकळ विकासाची गर्जना करायची तसेच आपले स्वार्थी समर्थक, लाचार कार्यकर्ते पोसायचे सच्या चळवळी करणाऱ्या मंडळींना या लाचार कार्यकर्ते समर्थकांना पुढे करुन नाहक बदनाम करायचे जिल्ह्यातील सामाजिक सेवाभावी चळवळी मोडून काढण्यासाठी आमच्यासारख्या मंडळींना बदनाम करुन सरकारी निधी हडप करणारे आता अवैध व्यवसायामुळे गुटखा भेसळ दारूमुळे लोक मरत असताना तरुण मुलींचे कुंकू फूसले जाताना लहान-लहान मुले पोरकी होत असताना आमदार, खासदार, मंत्र्यांच्या, नेत्यांच्या मागून गाड्या घेऊन फीरणारे गाँगलडाँन पदाधिकारी अवैध व्यवसाय जिल्ह्यातून बंद करण्यासाठी हप्तेखोर अधिकाऱ्यांना धारेवर धरुन गुटखा, भेसळ दारु जिल्ह्यातून बंद का करीत नाही. असाही सवाल श्री. पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे.

_*😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे ‘सुर्या गॅस’..*_

     *🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_

*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*

🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.

*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!