कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 भावनांवर नियंत्रण व प्रलोभनांचा त्याग केल्यास संस्कारक्षम पिढीची निर्मिती ; प्रा. रुपेश पाटील

*🟥 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कनेडी येथे व्याख्यान..*

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१४ :-* शालेय जीवन म्हणजे आपल्या आयुष्याला घडविण्यासाठीचे सर्वोत्तम काळ असतो. या वयात मिळालेले संस्कार हे आपल्या भावी आयुष्याला दिशा देतात. म्हणून विद्यार्थ्यांनी सातत्याने वाचन, मनन आणि चिंतनासाठीआपला वेळ द्यावा. वयात आलेल्या मुलांना बाह्य जगाचे आकर्षण असते, तेव्हा त्यांना आपल्या भावभावनांवर नियंत्रण ठेवता आले पाहिजे, तसेच विविध प्रलोभनांचा त्याग करता आला पाहिजे तरच संस्कारक्षम पिढी निर्माण होईल असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी व्यक्त केले.

कणकवली तालुक्यातील कनेडीगट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. एम. एम. सावंत ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस अॅण्ड कॉमर्स कनेडी, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी यांच्यावतीने ‘आजादी का अमृतमहोत्सवानिमित्त’ ‘तारुण्याच्या उंबरठ्यावर’ या विषयावर आयोजित व्याख्यानात प्रा. रुपेश पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, कनेरी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे संचालक संजय सावंत, शालेय समितीचे खजिनदार गणपत सावंत, प्राचार्य एस. डी. दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या व्याख्यानातून प्रा. रुपेश पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शालेय जीवनातील करावयाच्या विविध गोष्टींचे मार्गदर्शन पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनने केले.

प्रा. पाटील पुढे म्हणाले की छत्रपती शिवराय यांना घडविणाऱ्या आदर्श राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंनी बालवयातच शिवबांना राम, कृष्ण व हनुमंतांच्या यशोगाथा सांगितल्या. म्हणूनच स्वराज्याची निर्मिती शिवराय करू शकले. सानेगुरुजींनाही आईने बालवयात विविध संस्कारक्षम गोष्टी शिकवल्या म्हणूनच आपल्याला साने गुरुजींचा संस्कारांचा अमूल्य ठेवा मिळू शकला. वयात आलेल्या मुलांना अनेक बाह्य गोष्टींचे आकर्षण होणे स्वाभाविक आहे, मात्र अशावेळी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. पालकांनीही आपल्या मुलांशी मैत्री करावी. जेणेकरून मुलांना योग्य वयात नेमके मार्गदर्शन मिळेल, असे सांगत प्रा. पाटील यांनी स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवराय, संभाजी महाराज व विविध राष्ट्रपुरुषांच्या जीवनातील प्रसंग मनोरंजक पद्धतीने सादर करीत व्याख्यानात रंगत आणली. यावेळी प्रा.पाटील यांनी विद्यार्थ्यांना विविध संस्कार गीतेही शिकवली. विद्यार्थ्यांनीही अत्यंत उत्स्फूर्तपणे व्याख्यानात सक्रिय सहभाग दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रसाद मसुरकर यांनी केले. यावेळी शाळेतील सहाय्यक शिक्षक – शिक्षिका मृणाल साटम, पल्लवी आठल्ये, साधना निवेकर, मकरंद आपटे, सुशीला कोळकर, मंदार मेस्त्री यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

 

———————————————————–

*😍खुषखबर.. 😍खुशखबर.. 😍खुशखबर…*

 

_*👨🏻‍🍳हॉटेलमध्ये काम करण्याची सुवर्ण संधी…….*_

 

महाराष्ट्रीयन, पंजाबी, साऊथ इंडियन आणि चायनीज पद्धतीचे (व्हेज आणि नॉनव्हेज) जेवण तसेच नाश्ता यासाठी कूक पाहीजेत – स्त्री/पुरुष 👩🏻‍🍳👨🏻‍🍳🧑🏻‍🍳

🔴अनुभव : अनुभवी.

🔴 वेळ: संपूर्ण वेळ.

 

*▪️वेटर पाहीजेत-स्त्री/पुरुष.* 👲🏻

🔴अनुभव : अनुभवी

🔴 वेळ: संपूर्ण वेळ.

 

*▪️किचन हेल्पर पाहीजेत – स्त्री/पुरुष*

🔴अनुभव :अनुभवी

🔴 वेळ: संपूर्ण वेळ.

 

*▪️मोरीवर आणि साफसफाई साठी कामाला पाहीजेत – स्त्री/पुरुष*

🔴अनुभव :अनुभवी

🔴 वेळ: संपूर्ण वेळ.

 

*▪️चपाती/भाकरी बनवण्यासाठी कामाला पाहीजेत -स्त्री/पुरुष*

🔴अनुभव :अनुभवी

🔴 वेळ: संपूर्ण वेळ.

 

 

*🎴संपर्क क्रमांक -* 9156125126/ 9272040963.

 

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!