सावंतवाडीत ‘रोटरी क्लब’ आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.०३: आज भारतासह संपुर्ण जग “पोलिओ मुक्त” झाले आहे. परंतु आजही पाकिस्तान आणि अफगाणिस्थान ही शेजारची देशात आजही पोलिओ बाधित मुले सापडत आहेत. याचा अर्थ जग पोलिओ मुक्त झाले असा होत नाही. पोलिओ मुक्त विश्व हा जागतिक रोटरी संघटनेचे ध्यास आहे आणि आज जग ९९.९ टक्के पोलिओ मुक्त आहे. तरी अजुन आपल्या बालकांना हा पोलिओ डोस दरवर्षी का दिला जातो, हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. या बाबत जनजागृती व्हावी आणि पोलिओ निर्मुलन कार्यात रोटरीचा सहभाग सर्वांना समजावा यासाठी रोटरीचे रत्नागिरी-सिंधुदूर्ग जिल्हाचे पोलिओ को-आॕर्डिनेटर रो. दिलीप म्हापसेकर यांनी रोटरी क्लब, सावंतवाडीच्या माध्यमातुन पोलिओ निर्मुलनत रोटरीचा सहभाग या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली होती. या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ अत्यंत साध्या पध्दतीने रोटरी अध्यक्ष रो.डॉ. राजेश नवांगुळ यांच्या यशराज हॉस्पिटल मध्ये करण्यात आला. यावेळी मराठी निबंधामध्ये सर्वप्रथम आलेल्या सौ. शलाका प्रदीप केरकर यांना प्रशस्तीपत्र आणि माजी राष्ट्रपती स्व. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे “फ्रॉम चॅलेंज टू अपोर्चुनिटी” हे पुस्तक भेट देण्यात आले. हे पुस्तक रोटरीच्या या वर्षीच्या ब्रीदवाक्य “रोटरी ओपन अपोर्च्युनिटी” ला साजेसे आहे, असे अध्यक्ष रो.डॉ. राजेश नवांगुळ यांनी सांगितले,
यास्पर्धेत इंंग्रजी माध्यमातून आलेल्या निबंधात भोंसले इंटरनॅशनल स्कुलचा विद्यार्थी चि.आयुष योगेश प्रभू, शिरोडा ह्या विद्यार्थ्यास विजेता घोषित केले.
या निमित्या रोटरी अध्यक्ष रो.डॉ. राजेश नवांगुळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि सुदृढ बालके, म्हणजे सुदृढ विश्व ही संकल्पना मांडताना २ नोव्हेंबर हा “जागतिक अर्भक दिन” म्हणून पाळला जातो. हे विशद केले. त्या अनुशंगाने आज या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आल्याचे ते म्हणाले.
रत्नागिरी-सिंधुदूर्ग जिल्हाचे पोलिओ समन्वयक रो. दिलीप म्हापसेकर यांनी या निबंध स्पर्धेचे आयोजन हे “पोलिओ मुक्त जग” यात रोटरी या जागतिक संघटनेचा सहभाग यावर ते बोलले. आणि या लढ्यात सहभागी झालेल्या सुजाण नागरीक, सरकारी यंत्रणा यांचे आभार मानले. तसेच या निबंध स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले. त्यांना ही ई-प्रशस्तीपत्र पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. या स्पर्धेचे आयोजन चेअरमन रो.सीए. सुधीर नाईक यांनी केले.
यावेळी रो. वसंत करंदीकर, रो. प्रमोद भागवत, रो. राजेश रेडीज, श्री.प्रदीप केरकर, श्री. राकेश रेडीज आणि हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

