कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या शपथविधी नंतर दाणोलीत कार्यकर्त्यांनी केला फटाके फोडून आनंदोत्सव
*
कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या शपथविधी नंतर दाणोलीत कार्यकर्त्यांनी केला फटाके फोडून आनंदोत्सव
✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴 सावंतवाडी, दि१०ऑगस्ट.:*
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला या विस्तारात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वाट्याला दोन कॅबिनेट मंत्री पदे मिळाल्याने जिल्ह्याच्या विकासात अधिकच भर पडेल. त्यात भाजपचे राज्यातील नेतृत्व रवींद्र चव्हाण यांचे केसरी येथे निवासस्थान असून या ठिकाणच्या स्थानिक भाजप कार्यकर्त्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत त्यामुळे आपल्या गावातील व्यक्तीची मंत्रिपदी निवड झाल्यामुळे येथील स्थानिक कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला असून येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शतप्रतिशत भाजपचे उमेदवार विजयी करण्याचा मनसुबा कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला. यावेळी देवसू येथील बूथ अध्यक्ष अशोक सावंत, यशवंत सावंत रुपेश सावंत, अमोल सावंत ,मंगेश परब. प्रकाश सावंत केसरी येथील प्रितेश सावंत, संदीप पाटील,उपसरपंच भरत गोरे, सातुळी बावळट सरपंच दिनानाथ कशाळीकर बंड्या सुकी, विठ्ठल परब इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

