कुडाळकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

भाजपा मध्ये महिला नेतृत्वाचा अपमान! फुटीरवादी सरकारचा निषेध!! जान्हवी सावंत

*🟥भाजपा मध्ये महिला नेतृत्वाचा अपमान! फुटीरवादी सरकारचा निषेध!! जान्हवी सावंत*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 प्रतिनिधी :*सिंधुदुर्ग नगरी*

*🎴 सिंधुदुर्ग , दि.१०ऑगस्ट*
भाजपाच्या नेतृत्वाखाली अस्तित्वात आलेल्या फुटीर सरकार मध्ये एकाही महिलेला कॅबिनेट मंत्रीपद दिले गेले नाही. भाजपाचे महिला धोरण हे फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५०% गाळलेल्या जागा भरण्यासाठीच आहे. केंद्रात फक्त दिखाव्या साठी, नावाला संधी दिली जाते. घटनात्मक-संविधानिक पदांवर बसवून निर्णयाचा अधिकार नसलेल्या शोभेच्या बाहुल्या किंवा विरोधकांवर चुकीच्या पद्धतीने ओरड मारण्यासाठीच संधी दिली जाते.
राष्ट्रीय पातळीवर संसदेत ३३% महिला आरक्षण विधेयक गेले ८ वर्ष समंत करण्यापासून अडवले आहे. महिलांना नेतृत्व आणि राजकीय निर्णय क्षमता ह्यापासून वंचित ठेवण्याची ही भाजप ची बुरसटलेली सनातानी वृत्ती आहे.हे अनेकवेळेस दिसले आहे. ज्या महाजन-मुंढे साहेबांनी भाजपा महाराष्ट्रात वाढवला त्यांच्या वारसदार ह्या पंकजा मुंढे व पूनम महाजन यांचे नेतृत्व बाजूला सारल्यासारखे वाटते ते ह्याच वृत्ती मुळे असा आमचा ठाम समज आहे.
शिवसेनेतून गद्दारी केलेल्या महिला आमदार यांनाही आपली जागा आत्ता कळली असेल! चित्रा वाघ मॅडमना ही आपला जागा कळली असेल! भविष्यात भाजपाने त्यांना संजय राठोड यांची पाठराखण करायची जबाबदारी दिली तरी नवल वाटायला नको. असो ह्या सरकार मधील कर्त्याधर्त्यांच्या बुरसटलेल्या विचारधारेचा निषेध!! आणि त्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या महिला आमदारांनी जनाची नसेल तर मनाची ठेवून फुटकळ आणि अधिकार नसलेली राज्यमंत्री आणि महामंडळ दिली तर ती नाकारावीत!!
आणखी एक म्हणजे आमचीच शिवसेना खरी शिवसेना आणि
आम्हीच खरे शिवसैनिक म्हणणाऱ्या एकाही आमदाराने शपथ घेताना वंदनीय बाळासाहेबांचे नाव घेतले नाही.

सौ.जान्हवी सावंत.
सिंधुदुर्ग शिवसेना महिला आघाडी, जिल्हाप्रमुख.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–
*😍खुषखबर.. 😍खुशखबर.. 😍खुशखबर…*

_*👨🏻‍🍳हॉटेलमध्ये काम करण्याची सुवर्ण संधी…….*_

महाराष्ट्रीयन, पंजाबी, साऊथ इंडियन आणि चायनीज पद्धतीचे (व्हेज आणि नॉनव्हेज) जेवण तसेच नाश्ता यासाठी कूक पाहीजेत – स्त्री/पुरुष 👩🏻‍🍳👨🏻‍🍳🧑🏻‍🍳
🔴अनुभव : अनुभवी.
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.

*▪️वेटर पाहीजेत-स्त्री/पुरुष.* 👲🏻
🔴अनुभव : अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.

*▪️किचन हेल्पर पाहीजेत – स्त्री/पुरुष*
🔴अनुभव :अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.

*▪️मोरीवर आणि साफसफाई साठी कामाला पाहीजेत – स्त्री/पुरुष*
🔴अनुभव :अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.

*▪️चपाती/भाकरी बनवण्यासाठी कामाला पाहीजेत -स्त्री/पुरुष*
🔴अनुभव :अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.

*🎴संपर्क क्रमांक -* 9156125126/ 9272040963.

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!