सारिका श्रीकृष्ण पुनाळेकर यांच्या सहकार्यातून आरोस विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील ४० विद्यार्थांना गणवेश कापड वाटप
सारिका श्रीकृष्ण पुनाळेकर यांच्या सहकार्यातून आरोस विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील ४० विद्यार्थांना गणवेश कापड वाटप
सावंतवाडी ता.०७ -:* आरोस – दांडेली येथील सारिका श्रीकृष्ण पुनाळेकर यांच्या सहकार्यातून आरोस विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील ४० विद्यार्थांना गणवेश कापड वाटप करण्यात आले. तसेच दहावी व बारावी प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम पारितोषिक व पुषपगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी संस्थेच्यावतीने सावंतवाडी येथील टीम शिवाजी फिटनेस सेंटर चे शिवाजी जाधव यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सौ.सारिका पुनाळेकर, कु.उपेंद्र पुनाळेकर, शिवाजी जाधव,जयसिंग परब, आरोस शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष निलेश परब, उपाध्यक्ष महादेव पांगम , संचालक आनंद नार्वेकर, पालक शिक्षक उपाध्यक्ष संतोष पिंगुळकर, राजन मालवणकर, प्रभारी मुख्याध्यापक सदाशिव धूपकर, सावंत सर, बागवे सर, निलेश देऊलकर ,प्रशालेचे शिक्षकवृंद,निलेश परब, पत्रकार मदन मुरकर , विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिवाजी जाधव यांनी सांगितले की,विद्यार्थ्यानी जिद्द, संघर्ष कष्ट करण्याची तयारी ठेवावी. यामुळे याचा पुढील जीवनासाठी नक्कीच फायदा होतो. नेहमीच सहकार्याची भावना ठेऊन समाजासाठी काम करणाऱ्या सौ.सारिका श्रीकृष्ण पुनाळेकर यांनी आरोस विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात केलेल्या या दातृत्वाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक सदाशिव धुपकर यांनी त्यांचे खास आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक मोहन पालेकर तर आभार प्रा.सुषमा गोडकर यांनी मानले.