जिल्हा शल्य चिकित्सकांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणाबाबत मनसेने घेतली पोलीस अधीक्षकांची भेट..
▪️प्रशासकीय कारभारात अटकाव करणाऱ्यांवर कारवाईची केली मागणी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.०२: कुडाळ येथील सोनोग्राफी सेंटर मधील त्या प्रकाराबाबत मनसेने आज पोलीस अधिक्षकांची भेट घेऊन निवेदन सादर केले. मागील काही कालावधीपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून प्रशासकीय कामात अडथळा निर्माण करीत दडपशाही होऊन त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचे प्रकार समोर येत आहेत. यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत जनतेमध्ये प्रचंड संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. कुडाळ येथील घटनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक हे त्यांना प्राप्त अधिकारानुसार सोनोग्राफी सेंटरवर तपासणी करण्यासाठी गेले असता संबंधित रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना बोलावून तपासणीसाठी गेलेल्या डॉक्टरांच्या समितीस अटकाव करण्याचा प्रयत्न करून त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. शिवाय धक्काबुक्की करण्यात आली असे रुग्णालयातील काही खाजगी कर्मचाऱ्यांकडून समजते. यामध्ये डॉक्टरांच्या मोबाईलमधील सर्व डाटा डिलीट करून त्यांना तपासणी न करणे बाबत धमकावण्यात आल्याचा प्रकार घडला. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक सिंधुदुर्ग यांनी न्याय मिळण्यासाठी रीतसर तक्रार देऊनही अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने मनसे आक्रमक झाली आहे.
एकवेळ रुग्णालयाचा कारभार निर्दोष असेलही परंतु राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना बोलावून अधिकाऱ्यांना दमदाटी करत धक्काबुक्की करून त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रकार म्हणजे जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था बिहारच्या धर्तीवर नेण्यासारखेच आहे. मागील काळात कणकवली येथील ट्रफिक हवालदार प्रकरण, अलीकडेच घडलेले कुडाळ तहसीलदारांना अनधिकृत वाळू कारवाई रोखण्यासाठी आलेली धमकी प्रकरण असे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्याची प्रतिमा मालिन होत आहे. त्यामुळे झालेल्या प्रकाराबाबत आपण गांभीर्यपूर्वक लक्ष वेधून कोणत्याही दबावाला बळी न पडता प्रशासकीय कामात अडथळा निर्माण करून जिल्हा शल्य चिकित्सकांना धक्काबुक्की करणाऱ्यांना तात्काळ कारवाई करावी असे मनसेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल कीनळेकर, अमित इब्राह्मपुरकर, शैलेश अंधारी, आपा मांजरेकर, रामा सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
*_🔥महाबचत..😍 महाबचत..😍 महाबचत..🔥_*
आता *ऑनलाईन🌎* पेक्षाही *स्वस्त दरात💰* सर्व *नामांकित💫* कंपन्यांचे *स्मार्टफोन📲* खरेदी करा…! *सावंतवाडीतचं🌴* आणि सोबत मिळावा *नवरात्री🛕* स्पेशल *खास🤩* भेटवस्तू….!🎁😍💃
*📲 म्युझिक कॉर्नर 🎧*
*🎤 सावंतवाडी 🎼*
_ग्राहकांसाठी_ *नवरात्री💃, दसरा☘️* _आणि_ *दिवाळीच्या🪔* _मुहूर्तावर घेऊन आले आहेत…!_ *स्मार्टफोन📱* _तसेच_ *एलईडी टीव्ही🖥️* _खरेदीवर_ *विशेष🎊* _सूट…! सोबत_ *BAJAJ FINANCE⚡* _आणि_ *SAMSUNG✨ SURE FINANCE* _तेही_ *0%💫* _व्याजदरासह…!_🤩
*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्टफोन:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️iPhone ▪️realme
▪️VIVO ▪️OPPO
▪️ONEPLUS
_तसेच_
*♦️आमच्या येथे Aiwa कंपनीच्या LED TV उपलब्ध:-*
▪️ *24″* एलईडी टीव्ही फक्त *6,500/-*
▪️ *32″* रेग्युलर फक्त *8,990/-*
▪️ *32″* स्मार्ट फक्त *10,990/-*
▪️ *32″* अँड्रॉइड + स्मार्ट फक्त *11,990/-*
▪️ *40″* स्मार्ट फक्त *14,990/-*
▪️ *43″* स्मार्ट फक्त *18,990/-*
▪️ *50″* स्मार्ट फक्त *24,990/-*
▪️ *55″* स्मार्ट फक्त *29,990/-*
_तसेच_
*👉 सर्व कंपन्यांचे LED टीव्ही होलसेल दरात व सुलभ हप्त्यामध्ये उपलब्ध…*
*👉 SMART TV Starts from…….Rs.10,990*
*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️Haier ▪️SONY
▪️Panasonic
_तसेच_
*👉 सर्व प्रकारच्या मोबाईल अँसेसरीजवर 40% पेक्षाही जास्त भरगोस सूट…*
*🏠आमचा पत्ता :* विठ्ठल मंदिर रोड -जयप्रकाश चौक,सावंतवाडी
*📲संपर्क : 7719918722*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

