बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडून देण्यात येणारे सुरक्षा किट वाटप ‘मनसे’ने बंद पाडले..
▪️वाटपासंदर्भात कामगारांच्या तक्रारी, नियोजनशून्य वितरण प्रक्रिया व भोंगळ कारभार..
▪️वितरण संस्थेला योग्य नियोजन करूनच वाटप करण्याच्या ‘मनसे’च्या सूचना..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴सिंधुदुर्ग,दि.१०: जिल्ह्यात ओरोस गोविंद मार्केट व कणकवली येथील बांधकाम कामगारांना सुरक्षा किट वाटप करण्याच्या शिबिरांबाबत कामगारांच्या अनेक तक्रारी मनसे कडे प्राप्त होत्या. कामगारांना किट साठी वारंवार हेलपाटे पडणे, किट मधील काही वस्तू गायब असणे, यादी नुसार वा हजेरी नुसार वितरण न करता खाजगी एजंटच्या माध्यमातून आलेल्या कामगारांना प्राधान्य देवुन गोरगरीब कामगारांवर अन्याय करणे, एजंटांमार्गात पैसेे उकळणे अशा अनेक तक्रारी मनसे कडे प्राप्त होत्या. आज दि.१० नोव्हेंबर २०२० रोजी ओरोस येथील वितरण प्रक्रियेत असाच सावळा गोंधळ चालू असून काही एजंट दडपशाही करत असल्याच्या तक्रारी कामगारांनी दूरध्वनीद्वारे मनसे कडे केल्या. त्याची तात्काळ गंभीर दखल घेत मनसेच्या शिष्टमंडळाने शिबिराच्या ठिकाणी धडक देत वाटप प्रक्रिया थांबविली.
कामगारांकडून प्राप्त तक्रारिंच्या अनुषंगाने कामगार अधिकारी, वितरण संस्था व्यवस्थापक व मनसेचे शिष्टमंडळ अशी संयुक्त बैठक घेऊन वाटपासंदर्भात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या कामगारांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत, असे सुयोग्य नियोजनच करूनच वाटप प्रक्रिया राबवावी अशी सूचना मनसे पदाधिकऱ्यांनी केली. शिवाय तालुका स्तरावर शिबिरे आयोजित करून वाटप प्रक्रिया राबवावी अशी मागणी मनसेने लावून धरली.
शेवटी कामगार कार्यालयातील सुविधकार अधिकारी श्री.कुबल यांनी दूरध्वनीवरून येत्या दोन दिवसांत बैठक आयोजित करून नियोजन केले जाईल अशी हमी दिल्याने प्रकरण थांबले.
यावेळी मनसेने तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, विनोद सांडव, जिल्हा सचिव बाळा पावसकर, उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर,बाबल गावडे,दीपक गावडे, सचिन ठाकूर,सुंदर गावडे,गुरू मर्गज,रामा सावंत,हितेंद्र काळशेकर यासंह पदाधिकाऱ्यांनी कामगारांना मनःस्ताप व आर्थिक भुर्दंड पडल्यास मनसेशी गाठ आहे असा इशारा दिला.
*_🔥फ्री होम डिलिव्हरी ती ही फक्त सावंतवाडी शहरापुरती मर्यादित..🔥_*
*🍝 शिवन्या फास्टफूड 🍜*
कोविड-19 च्या काळात आमच्या सर्व ग्राहकांसाठी सावंतवाडीत आम्ही पुन्हा एकदा सुरू करीत आहोत. *फ्री होम डिलिव्हरी* सुविधा आणि ती ही पूर्णपणे सुरक्षित..
🍢गोबी मंचुरी ₹25/-
🥘फ्लॉवर चिल्ली ₹40/-
🥟स्टीम मोमो ₹20/-
*_🤷🏻♂️खायला येणार कुठे? त्यासाठी आमचा पत्ता आहे,_*
हॉटेल मँगो 1 समोर, सावंतवाडी..
*_🙋🏼♂️मग वाट कसली पाहताय! उचला फोन आणि करा कॉल.._*
*_📱9404931801_*
*_📱9146144203_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

