सिंधुदुर्गातील खाजगी रुग्णालयांत सर्व सामान्य जनतेच्या हितावह उपाययोजना व्हाव्यात..
▪️’मनसे’ची जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कडे मागणी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.०२: मनसेच्या शिष्टमंडळाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक श्रीमंत चव्हाण यांची भेट घेऊन जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात सर्वसामान्य जनतेच्या होणाऱ्या पिळवणुकीबाबत लक्ष वेधले. जिल्ह्यातील काही खाजगी रूग्णालयांमध्ये तपासणीच्या नावाखाली डाॕक्टरांकडुन लुट सुरु असून सर्वसामान्य जनतेची पिळवणूक होत असल्याच्या काही तक्रारी प्राप्त असून जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून खाजगी रुग्णालयांवर कोणताही वचक नसल्याचे चित्र आहे. याबतीत जनतेतील असंतोष दूर होण्याच्या दृष्टीने आपण उचित उपाययोजना व्हाव्यात ह्या हेतूने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने काही कायदेशीर तरतुदीत असलेल्या मुद्यांकडे लक्ष वेधले. यामध्ये काही खाजगी रुग्णालयांत रुग्णांकडून अवास्तव फी आकारणी केली जात असून त्यावर आळा बसणे गरजेचे आहे. यासाठी मेडिकल कौंसिल आॕफ इंडियाने (MCI) निर्धारीत केलेल्या नियमांनुसार सर्व खाजगी रुग्णालयांत दरपत्रक लावणे बंधनकारक करावे. शिवाय रुग्णालयांनी विविध घटकनिहाय तपासणीचे दर हे आपल्या रुग्णालयाच्या दर्शनी भागावर सुस्पष्ट लावावेत. काही रुग्णालये कर चुकवेगिरी साठी बील पक्क्या स्वरुपात न देता साध्या कागदावर देत असल्याचे दिसून येते. त्यामुळे रुग्णांना जीएसटी नंबर असलेले पक्के बिल देण्याबाबतचे निर्देशित करण्यात यावेत. रुग्णालयांत रुग्ण दाखल होत असताना उपचारांबाबतचे कोटेशन देणे बंधनकारक करावे अशा सूचना मनसेच्या निवेदनात उल्लेखित आहेत.
या मुद्द्यांबाबत तात्काळ अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने तात्काळ कार्यवाही व्हावी अन्यथा झोपलेल्या आरोग्य प्रशासनाला जागं करण्यासाठी मनसे आंदोलनाचा पवित्रा हाती घेईल असा इशारा मनसेने दिला आहे.
यावेळी मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेेकर, कुडाळ सचिव राजेश टांगसाळी, अणाव सरपंच अमित इब्राहीमपूरकर, शैलेश अंधारी, रामा सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
*_🔥फ्री होम डिलिव्हरी ती ही फक्त सावंतवाडी शहरापुरती मर्यादित..🔥_*
*🍝 शिवन्या फास्टफूड 🍜*
कोविड-19 च्या काळात आमच्या सर्व ग्राहकांसाठी सावंतवाडीत आम्ही पुन्हा एकदा सुरू करीत आहोत. *फ्री होम डिलिव्हरी* सुविधा आणि ती ही पूर्णपणे सुरक्षित..
🍢गोबी मंचुरी ₹25/-
🥘फ्लॉवर चिल्ली ₹40/-
🥟स्टीम मोमो ₹20/-
*_🤷🏻♂️खायला येणार कुठे? त्यासाठी आमचा पत्ता आहे,_*
हॉटेल मँगो 1 समोर, सावंतवाडी..
*_🙋🏼♂️मग वाट कसली पाहताय! उचला फोन आणि करा कॉल.._*
*_📱9404931801_*
*_📱9146144203_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

