आमदार वैभव नाईक यांची सावंतवाडीत मोठी राजकीय खेळी ???

 

 

आमदार वैभव नाईक आणि माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या भेटीबद्दल जनतेत पराकोटीची उत्सुकता

 

 

सावंतवाडी, दि.३०:- माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर हे एक सर्वसामान्य गरीब जनतेचा चेहरा म्हणून संपूर्ण सावंतवाडी मध्ये प्रसिद्ध आहेत. सर्वांना माहीतच आहे की ते एकेकाळी आमदार दिपक केसरकर यांचे खंदे समर्थक होते.काळाच्या ओघामध्ये आमदार दिपक केसरकर यांनी राष्ट्रवादी सोडत शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळी दिपक केसरकर यांच्याशी असलेली बांधिलकी लक्षात घेऊन बबन साळगावकर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या चिन्हा वर ते मोठ्या मतांनी सावंतवाडी नगरपरिषदेत थेट नगराध्यक्ष म्हणून बबन साळगावकर निवडून आले. बबन साळगावकर यांनी गेली अनेक वर्षे केलेल्या कामाची त्यांना त्या निवडणुकीतून जनतेकडून जणू पोच पावतीच मिळाली होती. त्यांनी त्यावेळी नगराध्यक्ष म्हणून काही काळ त्यांनी सुंदर जनतेची सेवाही केली, मात्र पुढे बबन साळगावकर यांची विधानसभेसाठी आमदार ह्या पदासाठी अर्ज भरण्याची इच्छा होती ह्या दरम्यान आमदार दिपक केसरकर आणि बबन साळगावकर यांच्यामध्ये राजकीय दुरावा निर्माण झाला. आणि बबन साळगावकर यांनी पुन्हा राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करून आमदारकी साठी आपला अर्ज दाखल केला परंतु त्या मध्ये त्याना यश आले नाही आणि त्यांचे नगराध्यक्ष पदही गेले. त्यामुळे समाजासाठी तळमळीने काम करणारा कार्यकर्ता बाजूला फेकला गेला. पदरी अपयश आले तरी बबन साळगावकर यांनी आपले समाज कार्य बंद केले नाही त्यांनी आपले कार्य सुरु ठेवले.

सध्या मूळ शिवसेना आणि शिंदेची शिवसेना यामध्ये वाद सुरु आहे शिवसेनेत उभी फूट निर्माण झाली आहे आणि आमदार दिपक केसरकर हे सुद्धा शिंदे च्या गटात सामील झाले आहेतत्यामुळे सावंतवाडी मध्ये सुद्धा दिपक केसरकर समर्थक आणि जुने शिवसैनिक अशी फूट पडलेली आहे. त्यातच मूळ शिवसेनेत असलेले आमदार वैभव नाईक यांनी राष्ट्रवादी चे बबन साळगावकर यांची आज सदिच्छा भेट घेतली परंतु ही सदिच्छा भेट समाजामध्ये बरीच गाजली सावंतवाडीकरांमध्ये त्यावर बऱ्याच चर्च्या रंगल्या… कारण एकाच दगडा मध्ये वैभव नाईक यांनी अनेक पक्षी मारले..राजकारणा पासून अलिप्त होण्याची पाळी आलेल्या बबन साळगावकर सारख्या सर्वसामान्य गरीब जनतेचा चेहरा असलेल्या सच्च्या कार्यकर्त्याला पुन्हा ऊर्जा देण्याचा तर हा प्रयत्न नाही ना किंवा कदाचीत यांच्या अनुभवाचा वापर करून मूळ शिवसेना सावंतवाडीत भक्कम करण्याचा तर प्रयत्न नाही ना?? आणि शिंदे गटाचे प्रवक्ते असलेल्या आमदार दिपक केसरकर यांना न बोलता शह दिला तर नाही ना??बबन साळगावकर यांचा मंद गतीने सुरु असलेला राजकीय प्रवास पुन्हा जोमाने सुरु होईल का??अशा चर्चाना सावंतवाडीत उधाण आले आहे त्यामुळे आजची भेट ही येणाऱ्या सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीसाठी सुरु झालेली खेळी तर नाही ना??याचे उत्तर मात्र येणारा काळच ठरवेल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!