सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या स्त्यावरील खड्डे रिक्षा चालकांनी श्रमदानातून बुजवले
*सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या स्त्यावरील खड्डे रिक्षा चालकांनी श्रमदानातून बुजवले*
*प्रतिनिधी सुनील आचरेकर*
*सिंधुदुर्ग*
सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्यावरील व रेल्वे स्टेशन परिसरातील रस्त्यावरील खड्डे रिक्षा चालकांनी व स्थानिक ग्रामस्थांनी लोक सहभागातून बुजवले गेले दोन वर्ष हा रस्ता डांबरीकरण करण्यात यावा अशी मागणी येथील प्रवासी रिक्षाचालक व ग्रामस्थांमधून वारंवार करण्यात आली होती परंतु याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष न दिल्यामुळे अखेर स्थानिकांनी पुढाकार घेतला यासाठी आवश्यक असलेली खडी भाई सावंत यांनी स्वखर्चाने उपलब्ध करून दिली त्यामुळे हा प्रश्न तुरताच मिटला मात्र कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी यासाठी या रस्त्याचे डांबरीकरण गणेश चतुर्थी पूर्वी व्हावे अशी मागणी येथील नागरिकांमधून तसेच रिक्षा चालकांमधून केली जात आहे. यावेळी बाबुराव गावडे, यशवंत राऊळ, राहुल शिर्के ,आदेश मळवे, प्रवीण गाडगे, शेखर बांबुळकर, प्रसाद मुसळे, निलेश नलावडे ,दिलीप पाताडे, आबा बोभाटे भाई बोभाटे, जितेंद्र राऊळ, पप्प्या गाडगे, नंदू टाकयेकर ,नितीन तिरोडकर ,भूषण भोगवेकर, प्रणील अवसरे, सुनील परब ,अशोक परब, संकेत सावंत, म्हसकर आधी रिक्षा व्यवसाय उपस्थित होते.

