सिंधुदुर्गात उद्या शुक्रवार पासून भात खरेदी केंद्रे होणार सुरू..
▪️भातासाठी २२०० रुपये दर; आ. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴सिंधुदुर्ग,दि.१२: पणन हंगाम २०२०-२१ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात खरेदीसाठी प्रत्येक तालुक्यात शेतकरी संघ आणि सोसायटीच्या ठिकाणी भात खरेदी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. कुडाळ येथील बजाज राईस मिल मार्फतही थेट शेतकऱ्यांकडून भाताची खरेदी करण्यात येणार आहे. उद्या शुक्रवार दि.१३ नोव्हेंबर २०२० पासून ही भात खरेदी केंद्रे सुरू होणार असून भातासाठी २२०० रुपये दर देण्यात येणार आहे. भाताची साठवणूक करण्यासाठी मार्केटिंग फेडरेशनने २० हजार बारदाने जिल्ह्यात पाठविली आहेत.
कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी यावर्षी लवकरात लवकर भात खरेदी केंद्रे सुरू करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी व शासनस्तरावर त्यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. त्याला यश आले आहे.
जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात खरेदीसाठी भात खरेदी केंद्रे निश्चित केली आहेत. शेतकऱ्यांकडून भात खरेदीची कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसेच कुडाळ येथील बजाज राईस मिलने गत वर्षी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन कडून भात खरेदी केले होते. त्यासाठी वेळ लागत होता. बजाज राईस मिलने थेट शेतकऱ्यांमार्फ़त भात खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी प्रयत्न केले होते. त्याला देखील मान्यता देण्यात आली आहे. आता बजाज राईस मिलमार्फत खरेदी केंद्रे निश्चित करण्यात आली असून थेट शेतकऱ्यांकडून भाताची खरेदी करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील भात खरेदी केंद्रे पुढीलप्रमाणे
कुडाळ तालुक्यात कुडाळ, माणगाव, घोटगे, कडावल, कसाल, निवजे, पणदूर,पिंगुळी एमआयडीसी, आंब्रड, हिर्लोक, आरोस
मालवण तालुक्यात पेंडूर, आचरा, चौके, कट्टा, विरण
सावंतवाडी तालुक्यात सावंतवाडी, मळगाव, मडूरा, तळवडे, डेगवे, कोलगाव, मळेवाड, भेडशी, इन्सुलि
वेंगुर्ले तालुक्यात वेंगुर्ले, शिरोडा, म्हापण, वेतोरे, तुळस
कणकवली तालुक्यात कणकवली, कनेडी, फोंडा, तळेरे, खारेपाटण
देवगड तालुक्यात देवगड, पडेल, पाटगाव, शिरगाव,
वैभववाडी तालुक्यात वैभववाडी, आचिर्णे
दोडामार्ग तालुक्यात दोडामार्ग या ठिकाणी भात खरेदी करण्यासाठी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_