आंजिवडे-पाटगाव घाट रस्त्याची या वर्षीच्या शासनाच्या आर्थिक बजेट मध्ये तरतूद होणारच; आ.वैभव नाईक

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सद्गुरु घावनळकर

🎴माणगाव,दि.09: आंजिवडे पाटगाव दरम्यानच्या भैरीची पानंद घाटा बाबतची माणगाव, वेंगुर्ले वाशी यांची तडफड व आस्था पाहता या वर्षीच्या शासनाच्या आर्थिक बजेट मध्ये तरतूद होणारच असे सूतोवाच कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी केले.

महादेवाचे केरवडे (तालुका कुडाळ) येथील बाळ केसरकर यांच्या फार्महाऊसवर कोल्हापूर वेंगुर्ले अंतर 50 किमी ने कमी करणाऱ्या या घाटाच्या पूर्ततेसाठी महत्त्वाचा मेळावा पार पडला. त्यावेळी आमदार नाईक यांनी आपले मत व्यक्त केले .यावेळी व्यासपीठावर किशोर शिरोडकर, बाळ सावंत, आबा केसरकर, सुभाष भिसे, दत्ताराम शिरसाट, मधुकर परब ,प्रभाकर परब, तुषार परब, एकनाथ केसरकर, अरुण म्हाडगुत, वेंगुर्ला माजी नगराध्यक्ष सुनील डूबळे,नंदन वेंगुर्लेकर, वनक्षेत्रपाल अमृत शिंदे, दिनकर म्हाडगुत, आनंद मेस्त्री, लवु पालकर, दादा बेलनेकर, बापू बागवे, साईनाथ नार्वेकर,हरी पालव,  कृष्णा पंदारे, प्रमोद म्हाडगुत्त, शंकर कोराणे,राजू कवितकर, चिंतामणी धूमक, श्रेया परब, बाळा परब, अजित परब,आत्माराम सावंत, वसंत दळवी, श्याम पावसकर, नरेश खरात, पंढरी परब, आदीं  ग्रामस्थ उपस्थित होते.

त्या वेळी आमदार नाईक म्हणाले कोकणच्या विकासात आंजिवडे घाटमार्ग महत्त्वाची भूमिका बजावणार आहे . एका बाजूला घोडगे सोनवडे घाट प्रगतीपथावर आहे. त्याच वेळी वेंगुर्ला कोल्हापूर सर्वात जवळच्या अंतराने जोडणारा आंजिवडे घाट पुढे आला आहे .या घाटाच्या आसपास कोणतेही अभयारण्य नसल्याने वनखात्याची फार अडचण येणार नाही .हे काम तात्काळ होणार नसले तरी कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण, दोडामार्ग या तालुक्यांच्या विकासाचा मानबिंदू ठरणार आहे. हा घाट झालाच पाहिजे यावर ते ठाम राहिले.

येत्या 18 फेब्रुवारी नंतर पालक मंत्री माणगाव खोऱ्यात येऊन या घाटा बाबतचा सविस्तर आढावा घेऊन पुढील निर्णय घेनार आहेत  असे वेंगुर्ला बैठकीत  पालकमंत्र्यांनी  सांगितले होते त्यानुसार मध्यवर्ती ठिकाण म्हणून हळदीचे नेरूर हायस्कूलमध्ये एक मोठी घाट परिषद घेऊन त्यावर शिक्कामोर्तब करायचाच असा निर्धार या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला, यावेळी या घाटाला वेंगुर्ले – माणगाव -पाटगाव – गारगोटी- कोल्हापूर असे नवीन शीर्षक देण्यात आले.

हा घाट झाल्यास माणगाव – कोल्हापूर अंतर 110की मी. , वेंगुर्ले – कोल्हापूर अंतर 125की मी.भरणार आहे. दुकान वाड- कोल्हापूर अंतर90की मी. त्तर अंजिवडेवरून कोल्हापूर केवळ 80की. मी.भरणार आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याने दोन वर्षांपूर्वी आंजिवडे घाटाचे सर्वेक्षण करून जागा भूसंपादन, रस्ता बांधणी ,लहान पूल ,संरक्षण भिंत, लहान मोऱ्या आदि विविध कारणासाठी ढोबळमानाने 32 कोटी 36 लाख रुपयाचा खर्च दाखविला आहे. आज काम सुरू झाले तर ते पूर्ण होईपर्यंत फार फार तर पन्नास कोटी पर्यंत खर्च जाईल. कोल्हापूर वेंगुर्ला अंतर येता जाता शंभर किलोमीटरने कमी होणाऱ्या या घाटासाठी ही रक्कम नगण्य आहे असे लोकांचे मत आहे.

_*🔥वर्षभराची जाहिरात केवळ १५ ते २० रुपयात..💥*_

💫डेट कॅलेंडर १५ रुपये (६ पानी आर्ट पेपर) (फर्मच्या नावे छपाई २०० पासून) साईज 10″×15″
💫पॉकेट डायरी २० रुपये (रेक्झीन कवर, छपाईसहित)
💫 विविध प्रकारच्या डेट डायऱ्या..
💫टेबल कॅलेंडर्स ५५ रुपये पासुन..
💫पॉलि कॅलेंडर्स १२ रुपये पासुन..
💫आधुनिक प्रकारचे नायलॉन, प्रिइंक शिक्के..

_*🌈खास एल.आय.सी. एजंट साठी उपयुक्त डेट कॅलेंडर व फाईल्स; शिवाय विविध प्रकारच्या भेटवस्तू 🤷🏻‍♂️*_

*💁🏻‍♂️ आमचा पत्ता ⬇️*
प्रसाद ऑफसेट, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*🙋🏻‍♂️मोबाईल नंबर ⬇️*
_*📱7057956111*_
_*📱9422065195*_
*💁🏻‍♀️ व्हाट्सअप नंबर ⬇️*
_*📲9822856111*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!