कणकवलीतील स्टेट बँकेत ग्राहकांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याप्रकरणी ‘भाजयुमो’ आक्रमक..

▪️पुन्हा नागरिकांच्या तक्रारी आल्या तर आंदोलन छेडण्याचा सरचिटणीस संदीप मेस्त्री यांचा इशारा..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.०२: शहरातील भारतीय स्टेट बँक शाखेत काही कर्मचारी व अधिकारी ग्राहकांना विनाकारण उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिकांना, पेन्शनर ग्राहकांना रांगांमध्ये उभे करून त्रास दिला जात आहे. या सर्व प्रकारचे आज कणकवलीत तीव्र पडसाद उमटले. भाजपा युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाने शाखा व्यवस्थापकांना एकूणच गैरसोयी विषयी जाब विचारला. त्यावेळी ग्राहकांना त्रास दिला जाणार नसल्याचे आश्वासन शाखा व्यवस्थापक श्री. चौधरी यांनी दिले.

भाजपा युवा मोर्चा जिल्हा संघटक सरचिटणीस संदीप मेस्त्री, जिल्हा चिटणीस संतोष पुजारे, तालुकाध्यक्ष गणेश तळगावकर, उपाध्यक्ष सुभाष मालंडकर, सचिन बांदीवडेकर, आनंद बांदल उपस्थित होते.

यावेळी सुरक्षा रक्षकाची ग्राहकांसोबत अरेरावी असते. ग्राहकांना चुकीची वागणूक देऊ नका. अशी शाखा व्यवस्थापक व शिष्टमंळात चर्चा करत असताना सुरक्षारक्षक वाद घालत होता. यावरुन जोरदार बचाबाची झाली. त्यानंतर सेवा देताना भाषा चांगली ठेवा, सुरक्षा रक्षकाला कामकाजात सुधारणा साठी कर्मचारी व अधिकारी यांना नोटिस काढणे, पेंशन धारक, जेष्ठ नागरिकांसाठी टेबल वाढवा, कर्मचारी वाढवण्यासाठी पाठपुरावा करणे अश्या मागण्या शाखा व्यवस्थापक चौधरी यांनी मान्य केल्या आहेत. यासंदर्भात आपण आमदार नितेश राणे यांचे लक्ष वेधणार आहे. पुन्हा नागरिकांच्या तक्रारी आल्या तर आंदोलन छेडण्याचा इशारा संदीप मेस्त्री यांनी दिला आहे.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

One thought on “कणकवलीतील स्टेट बँकेत ग्राहकांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याप्रकरणी ‘भाजयुमो’ आक्रमक..

  • November 2, 2020 at 4:21 pm
    Permalink

    यांचे व्याजाचे दर असे एकदम ईतके कमी कसे झाले?याचीहि विचारणा होऊदे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!