माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे राजकीय वजन संपले म्हणणाऱ्यांनी स्वतःच स्वतःला किराणा दुकानदार बनवून घेतले; रूपेश कानडे
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴कुडाळ,दि.०२: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले तर शिवसेनेच्या प्रत्येक नेत्याला माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्यावर बोलावेच लागते, नाहीतर परत मुंबईला गेल्यावर मातोश्रीच्या अंगणात प्रवेश मिळत नाही. काल जिल्ह्यात आलेल्या महसुल आणि बंदरे विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी हाच कित्ता गिरवला. अशी टीका भारतीय जनता युवा मोर्चा कुडाळ तालुकाध्यक्ष रुपेश कानडे यांनी केली.
ते पुढे म्हणाले, काल एका पक्षाला बिहारमध्ये हवे ते निवडणूक चिन्ह मिळाले नाही. मिळाले ते बिस्कीट! त्याला स्मरून पक्ष प्रमुखांना खुश करण्यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर काहीतरी बोलायलाच हवे म्हणून काहीजण इथे येऊन बोलून जातात. पण यांच्या बोलण्याने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे राजकीय वजन तसूभरही कमी होणार नाही. पण बोलणाऱ्याची परिस्थिती काय होते, याचे जवळचे उदाहरण म्हणजे माजी पालकमंत्री दीपक केसरकर आहेत.
काल जिल्ह्यात आलेल्या महसूल मंत्र्यांचा रेडीमध्ये पूर्व नियोजित दौरा असताना त्यांच्या दौऱ्याला अधिकारी गैरहजर राहिले. त्याची तक्रार मुख्य सचिवांजवळ करावी लागते व आम्ही काय किराणा दुकानदार आहोत का विचारावे लागते? खऱ्या किराणा दुकानदारांच्या दारात ग्राहकांची गर्दी असते. हे देखील ते विसरले. यांच्या राजकीय दुकानदारीत हे मंत्री असून साधा अधिकारी सुद्धा यांच्याकडे फिरकत नाहीत, यातच त्यांचे आणि त्यांच्या पक्षाचे राजकीय वजन काय आहे, हे त्यांच्या लक्षात यायला हवे होते. राणेंवर टीका करणाऱ्यांचे फक्त शारीरिक वजन वाढते, राजकीय नाही. हे वास्तव जिल्ह्यातील जनतेला कळून चुकले आहे. मंत्र्यांनी सत्ता आहे, तोवर जनतेच्या पैशांनी जिल्ह्यात काढलेल्या पर्यटन दौऱ्यात खुशाल आपले मन रिझवावे, पण मातोश्री किराणा दुकानातील तागडीत वरचढ होण्यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणेयांच्यावर टीका करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न टाळावा, हाच आमचा सल्ला राहील असे भारतीय जनता युवा मोर्चा कुडाळ तालुकाध्यक्ष रुपेश कानडे यांनी बजावले आहे. तसेच अधिकारी न आल्यावर मी काय किराणा दुकानदार वाटलो का म्हणत म्हणून मुख्य सचिवांना धारेवर धरताना, तमाम किराणा दुकानदारांना कमी लेखले आहे. किराणा दुकानदाराना तुच्छ लेखणाऱ्या महसूल राज्यमंत्र्यांचा भारतीय जनता यूवा मोर्चा तर्फे जाहीर निषेध करत आहे, असे रुपेश कानडे म्हणाले.
_*😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे ‘सुर्या गॅस’..*_
*🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_
*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*
🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.
*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_