कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

कुराश(जुडो-कराटे) स्पर्धेत महाराष्ट्र संघातुन इन्सुलीची कु.रिया महेंद्र पालव सिल्व्हरपदकाची मानकरी

कुराश(जुडो-कराटे) स्पर्धेत महाराष्ट्र संघातुन इन्सुलीची कु.रिया महेंद्र पालव सिल्व्हरपदकाची मानकरी

इन्सुली -अंकुश नाईक

कुराश असोसिएशन महाराष्ट्र आयोजित सातारा-कराड येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कुराश(जुडो-कराटे)स्पर्धेत इन्सुलीच्या कु.रिया महेंद्र पालव ही सिल्व्हरपदकाची मानकरी ठरली.त्याचबरोबर रिया हीची राजस्थान येथे झालेल्या ५७ किलो वजनी गट नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत महाराष्ट्र संघात निवड सुद्धा करण्यात आली होती.तिच्यासोबत सिंधुदुर्ग मधुन एकुण ४ मुलांची या स्पर्धेत निवड करण्यात आली होती.कु.रिया पालव हीने केलेल्या मेहनतीमुळे तसेच यासाठी तिला सहकार्य करणारे वसंत जाधव सर आणि दिनेश जाधव सर यांच्यामुळे तिला ही संधी प्राप्त झाल्याची तिच्या वडीलांनी सांगितले.यासाठी इन्सुली आणि पंचक्रोशीत रिया हीचे कौतुक होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!