अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गच्या विद्यार्थी संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी कुमार अनुपसेन अमरसेन सावंत यांची निवड
अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गच्या विद्यार्थी संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी कुमार अनुपसेन अमरसेन सावंत यांची निवड
अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्ग या संघटनेने सध्या मराठा समाजाची संघटना वाढीवर भर दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आज अखिल भारतीय मराठा महासंघाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडीबाबत एक पाऊल म्हणून विद्यार्थी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी कुमार अनुपसेन सावंत यांची नियुक्ती केली आहे. असे पत्र आज कुडाळ एमआयडीसी रेस्ट हाऊस येथे मराठा समाजाच्या बैठकीत देण्यात आले. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिकत असताना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते, ज्यामध्ये शैक्षणिक शिष्यवृत्ती असेल, इतर शैक्षणिक सोयी सुविधा असतील, तसेच महाविद्यालयीन व शालेय सोयी-सुविधा असतील अशा अडचणींना सामोरे जावे लागते. अशा मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी व तळागाळातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आज अखिल भारतीय मराठा महासंघाच्या विद्यार्थी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी कुमार अनुपसेन अमरसेन सावंत यांची नियुक्ती केली आहे. नियुक्ती केल्यानंतर मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शालेय अडचणी सोडवणे यास आपले प्र

