उत्कर्ष युवक मंडळातर्फे ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर २०० झाडांचे वृक्षारोपण
उत्कर्ष युवक मंडळातर्फे ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर २०० झाडांचे वृक्षारोपण
मंडळाचे अध्यक्ष नितीन राऊळ,सचिव रामचंद्र नाईक यांच्या दक्षतेखाली स्वागत नाटेकर आणि प्रदीप पेडणेकर यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या उपक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद
इन्सुली-उत्कर्ष युवक मंडळातर्फे ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर इन्सुली-डोबाशेळ येथे २०० झाडे लावण्याचा उपक्रम पार पडला.मंडळाचे अध्यक्ष नितीन राऊळ आणि सचिव रामचंद्र नाईक यांच्या दक्षतेखाली आणि सदस्य स्वागत नाटेकर तसेच प्रदीप पेडणेकर यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या या उपक्रमात मंडळाच्या कार्यकर्त्यांसह वनविभागाचे अधिकारी सुद्धा सामील झाले होते.निसर्गाचा समतोल रोखण्यासाठी या २०० झाडांचे वृक्षारोपण इन्सुली घाटात करण्यात आले.या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत कार्यक्रम यशस्वी झाला.