मराठा समाजाला पुन्हा धक्का; EWS आरक्षणाचा लाभ देण्यासंदर्भातील जीआरही रद्द
मराठा समाजाला पुन्हा धक्का; EWS आरक्षणाचा लाभ देण्यासंदर्भातील जीआरही रद्द
मुंबई – मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करत मोठा धक्का दिला. त्यानंतरपासून मराठा समाज अधिक आक्रमक झाला आहे.
त्यामुळे राज्य सरकारने ईडब्ल्यूएस अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी जीआर काढला होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने हा जीआर देखील रद्द केला आहे. मराठा समाजासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. (Maratha Reservation news in marathi) बारा टक्क्यांतून मराठा आरक्षण शक्य : विनोद पाटील मुंबई उच्च न्यायालयाने जीआर रद्द केल्यामुळे मराठा समाजातील तरुणांना आता EWS आरक्षणाचा लाभही घेता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य सरकारने EWS अंतर्गत देण्यात येणाऱ्या १० टक्क्यांमध्ये मराठा समाजाचा समावेश केला होता. मात्र EWS प्रवर्गातील अनेकांनी राज्य सरकारच्या जीआरला आव्हान दिलं होतं. या याचिका मान्य करत न्यायालयाने सरकारचा जीआर रद्द केला आहे.

