पुणे भिवंडी गावच्या हद्दीत सासवड ते कापुरहोळ रोडवर २९ लाखाची गोवा बनावटी दारू जप्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्यातील तीघांना घेतले ताब्यात.
निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,विभागीय भरारी पथक,पुणेयांच्या पथकाने मिळालेल्या खात्रीलायक बातमीच्अनुषंगाने पुणे जिल्हयातील, पुरंदर तालुक्यातील, *भिवडी गावचे हददीतील,सासवड ते कापूरहोळ रोडवर* *आयशर* कंपनीचा प्रो 1059 बीएस आयव्ही मॉडेलचा चार चाकी टेंम्पो क्रमांक *MH 07/ AJ 9798* थांबवून सदर वाहनाची दारुबंदी गुन्हयाअंतर्गत तपासणी केली असता, वाहनामध्ये *गोवा राज्य निर्मीत व विक्रीस परवानगी असलेले* *गोल्डन एस ब्लू फाईन व्हिस्की* या ब्रॅण्डच्या 750 मि. ली. क्षमतेच्या 2400 सिलबंद बाटल्या *(200 बॉक्स )*, *गोवा राज्य निर्मीत व विक्रीस परवानगी असलेल्या हनी ब्लेन्ड प्युअर ब्रॅण्डीच्या* 180 मि. ली. क्षमतेच्या 3840 सिलबंद बाटल्या *(80 बॉक्स )* व *गोवा राज्य निर्मीत व विक्रीस परवानगी असलेले ग्रीन ॲप्पल व्होडकाच्या* 180 मि. ली. क्षमतेच्या 960 सिलबंद बाटल्या *(20 बॉक्स)* असे *एकुण 300 बॉक्स* मिळून आले. वाहनातील इसमांकडे मद्य वाहतूकीचे संदर्भातील कोणताही वाहतूक पास, परवाने अथवा कोणतीही कागदपत्रे मिळून आली नाहीत. तसेच सदरचा मद्य साठा महाराष्ट्र राज्यात विक्री करण्याचे उददेशाने वाहतूक करुन आणल्याचे आरोपींच्या तपासातून स्पष्ट झाल्याने त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65 अ,ई,81,83,90, 103 व 108 अन्वये गु.र.क्र. 260/2022 दि. 24/07/2022* नुसार गुन्हा नोंद करुन सदर ठिकाणावरुन वरील वर्णनाचे गोवा राज्य निर्मीत व विक्रीस परवानगी असलेले विदेशी मद्य व टेंम्पो क्रमांक MH 07/ AJ 9798 तसेच आरोपीकडील मोबाईल फोन असा *एकूण रु. 29,55,720/-* किंमतीचा मुददेमाल जागीच जप्त करण्यात आला.
तसेच जप्त वाहनामध्ये मिळून आलेले इसम नामे *1)लक्ष्मीप्रसाद सखाराम मांजरेकर* वय 39 वर्षे *रा. गाडी अड्डा,बी.के.रोड, ता.वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग* , *2)राकेश भरत परब* वय 31 वर्षे *रा. घर नं. 227,कॅम्प भटवाडी, ता.वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग* व *3) मंदार वामन माणगांवकर* वय 29 वर्षे *रा. उभा दांडा,नमसवाडी ता.वेगुंर्ला जि. सिंधुदुर्ग* यांना सदर गुन्हयात अनुक्रमे आरोपी क्र. 1,2 व 3 म्हणून जागीच अटक करण्यात आले आहे.
सदर कारवाईमध्ये निरीक्षक श्री.दिगंबर शेवाळे, दुय्यम निरीक्षक श्री. ए.सी.फडतरे, जवान स्टाफ सर्वश्री प्रताप कदम, सतीश पोंधे, अनिल थोरात ,अहमद शेख,अमर कांबळे, भरत नेमाडे, तसेच अमोल दळवी यांनी सहभाग घेतला आहे.