राज्य उत्पादन शुल्क व वाहतूक पोलिसांची म्हणे मोठी कारवाई,सतरा हजाराची दारु आणि सहा लाखाची कार मिळून मुद्देमाल…
राज्य उत्पादन शुल्क व वाहतूक पोलिसांची म्हणे मोठी कारवाई,सतरा हजाराची दार आणि सहा लाखाची कार मिळून मुद्देमाल…
कोरोडो रुपायाची गोवा बनावटी दारू सिंधुदुर्गातून पास होऊन गेलेली पुणे नाशिक यथे पकडली जाते
राज्य उत्पादन शुल्क,लाठी वरील पोलिंसांच्या डोळ्यावर गांधारीची पट्टी
सावंतवाडीतील दारु तस्करांना पुण्यात,नाशिकात केली जाते अटक
सावंतवाडी दि२९: आलिशान कार मधून बेकायदा दारूची वाहतूक केल्याप्रकरणी पुणे येथील एकाला आज दाणोली-बावळट तिठ्यावर अटक केली आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाला त्यांनी चकवा देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला दाणोली तिठ्यावर असलेल्या पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले.
सुशांत नितीन पुरोहित (३३) रा. सदाशिवपेठ, असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून १७ हजाराच्या दारूसह ६ लाख रूपयाची कार, असा मिळून ६ लाख १७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज पहाटे पाच वाजता राज्य उत्पादन शुल्क व सिंधुदुर्ग वाहतुक पोलीस यांच्या संयुक्त पथकाकडून करण्यात आली.
फक्त सतरा हजाराची दार आणि राज्म उत्पादन शुल्क विभागाची तत्परता, सिंधुदुर्गातून कोट्यवधी रुपयांची दारू,पुणे, नाशिक, मुंबई येथे स्थायिक मुले पायलटींग करुन घेऊन जात असताना हा विभाग काय कुंभकर्णाची झोप घेत असतो,लाठीवरील पोलिस काय चिर निद्रेत असतात याची उत्तरेही आता यांना द्यावी लागणार आहेत…

