कोकणसिंधुदुर्ग

सावंतवाडी शहर सह,तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये बदल..

*सावंतवाडी शहर सह,तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये बदल..*

 

*केसरकर समर्थकांना पदावरून हटवत नवीन पदे नियुक्त*

 

 

*सावंतवाडी, दि.१९:-* आमदार दिपक केसरकर हे शिंदे गटात सामील झाल्यावर त्यांचे समर्थक म्हणून काही कार्यकर्त्यांनी दिपक केसरकर यांना पाठिंबा दिला आहे. त्यातील काही आमदार दिपक केसरकर समर्थक शिवसेनेचे पदाधिकारी होते त्याची आज शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी पदावरून हकालपट्टी करत नवीन कार्यकारणी जाहीर केली आहे.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा सावंतवाडी तालुका प्रवक्तेपदी चंद्रकांत कासार,सावंतवाडी शहर प्रमुख पदी शैलेश गवंडळकर,उपतालुका प्रमुखपदी माजगाव विभाग विष्णू उर्फ आबा सावंत,माजगाव जि.प. विभाग प्रमुख पदी भगवान उर्फ सुनील गावडे,महिला आघाडी उप तालुका प्रमुख पदी सौ.भारती कासार,विभाग प्रमुख पदी माजगाव सौ. श्रेया कासार अशी नवीन पदे नियुक्त करण्यात आली आहे. यावेळी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, महिला तालुकाप्रमुख अपर्णा कोठवळे, माजी जि.प.मायकल डिसोझा, गुणाजी गावडे, शब्बीर मणियार,योगेश नाईक, रश्मी माळवदे,श्रुतिका दळवी,प्रश्नांत बुगडे, यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!