दुर्मिळ रक्तगटाचे रक्तदान दोन रुग्णांचे जीव वाचवले
*युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून रक्तदान*
सिंधुदुर्ग : ओरोस जिल्हा रुग्णालयामध्ये अॅडमिट असलेल्या सखराम जगताप या रुग्णाला B- निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाच्या रक्ताची तातडीने आवश्यकता होती. तेव्हा सिध्देश नाईक, उमेश वारंग रा. हुमरस यांनी भरपावसात ओरोस जिल्हा रुग्णालय रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले. तर महेंद्र उर्फ मया डुबळे, सागर साळगावकर यांनी सावंतवाडी येथील महिला रुग्णाला आॅपरेशन दरम्यान रक्ताची गरज होती, त्यावेळी ओरोस रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करुन जीवनदान दिले. युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून ह्या दात्यांनी क्षणाचाही विलंब न करता रक्तदान केल. त्याबद्दल युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी सर्व दात्यांचे आभार मानले आहेत.

