सावंतवाडीत रंगली संगीत मैफिल..
🟥 सावंतवाडीत रंगली संगीत मैफिल..
🟥“सद्गुरू संगीत विद्यालय,सावंतवाडी” यांच्या ७० व्या व “सैनिक नागरी सहकारी पतसंस्था सावंतवाडी” यांच्या ३०व्या वर्धापन दिनानिमित्त “स्वरानुबंध” या कार्यक्रमाचे आयोजन
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी,दि.३: श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ व सैनिक नागरी सहकारी पतसंस्था सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने, “सद्गुरू संगीत विद्यालय,सावंतवाडी” यांच्या ७० व्या व “सैनिक नागरी सहकारी पतसंस्था सावंतवाडी” यांच्या ३०व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित “स्वरानुबंध” या संगीत मैफिलीने उपस्थितांची मने जिंकली.
सावंतवाडी नगर पालिकेच्या शिव उद्यानासमोरील जागेत पार पडलेल्या या संगीत मैफिली मध्ये कै. गुरुवर्य रघुनाथ उर्फ बाबी मेस्त्री यांचे शिष्य (सद्गुरू संगीत विद्यालयाचे यशस्वी व नामांकित माजी विद्यार्थी) यांचा सहभाग होता त्यामध्ये श्रीपाद चोडणकर, सुनील पाडगावकर, सौ नीलम पोकळे, हनुमंत सावंत, उज्वला केरकर, किरण सिद्धये , सुनिल गोवेकर, सौ अनघा गोगटे, सौ मंजिरी धोपेश्वरकर, सौ मनीषा कोरगावकर, श्री चंद्रकांत घाटे ( स्वतंत्र हार्मोनियम वादन), श्री यशवंत रसाळ, श्री दामोदर मांजरेकर, श्री राजू पास्ते, या सर्वांनी एकाहून एक सरस गीते सादर केली.
त्यानंतर सौ मनीषा कोरगावकर, सौ मंजिरी धोपेश्वरकर व अनघा गोगटे यांनी आदि देवा पांडुरंगा ही भैरवी सादर केली आणि सद्गुरू संगीत विद्यालयाच्या विद्यमान विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची पवित्र भूमी व सैनिक हो तुमच्यासाठी हे गीत सादर करून सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली
या मैफिलीला हार्मोनियम साथ मंगेश मेस्त्री, चंद्रकांत घाटे, सुरेश मेस्त्री यांनी केली व ऑर्गन साथ सद्गुरू संगीत विद्यालयाचे संचालक श्री नीलेश रघुनाथ मेस्त्री यांची लाभली, तबला साथ जिल्ह्यातील नामवंत तबला वादक श्री किशोर सावंत, श्री बंड्या धारगळकर व श्री दिनकर परब यांनी केली तसेच बासरीची साथ रमेश घाटकर यांनी केली संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय कात्रे यांनी केले, प्रास्तविक श्री वैभव केंकरे यांनी केले व आभार प्रदर्शन कु वर्षा देवण हिने केले तर श्री. सुभाष शिरोडकर यांनी ध्वनीसंयोजनाची धुरा सांभाळली.
या प्रसंगी आपल्या सावंतवाडी शहराचे माजी नगराध्यक्ष श्री संजू परब, बबन साळगावकर, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, राष्ट्रवादीच्या सावंतवाडी विधानसभा प्रमुख सौ अर्चना घारे-परब, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष व उद्योग व्यापार सेल जिल्हाध्यक्ष श्री. पुंडलीक दळवी, वसंतराव उर्फ भाऊ साळगावकर, सौ गुणवंती केरकर, सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुनील राऊळ आणि चेअरमन श्री शिवराम जोशी त्याचप्रमाणे संस्थेचे संचालक मंडळ व सर्व कर्मचारी,श्री बाबुराव कवीटकर, श्री चंद्रकांत शिरसाट,श्री प्रल्हाद तावडे, रवींद्र मडगावकर, सुहास सावंत, वैजनाथ देवण, हेमंत खानोलकर सोमा सावंत, तानाजी सावंत, उत्कर्षा मेस्त्री, व सद्गुरू संगीत विद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी वर्ग व सर्वच क्षेत्रातील मान्यवर या संगीत मैफिलीला उपस्थित होते
तसेच सद्गुरू संगीत विद्यालयाचे संचालक गुरुवर्य श्री.निलेश मेस्त्री यांनी विद्यालयाच्या ७५ व्या वर्धापनदीना वेळी विद्यालयाच्या आजी व माजी विद्यार्थ्यांचा कार्यक्रम करण्याचा मानस व्यक्त केला, या मैफिलीला रसिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला.
———————————————
*🌴साई सावली क्लासेस🙏*
▪️आपणास कळविण्यात आनंद होतो की,आम्ही *सावंतवाडी,बिरोडकर टेंब सुर्वण काॅलनी येथे दत्ताराम शिरोडकर (विष्णू कृपा)🏡* यांच्या घरात साई सावली नावाने *👩🏻💼१ ली ते ७ वी 🧑🏻💼पर्यंत चे क्लास सुरू केले आहेत.*
तरी या सुवर्ण संधीचा बिरोडकर टेंब परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
*सौ,अन्वी आनंद धोंड*
*एम.ए.बी.एड*
*मो,९१४६७२९८९२/९४२३९५८८२८*
*🏢कोलगाव उच्च माध्यमिक विद्यालय कोलगाव*
आणि
*🏤कळसुलकर हायस्कूल मध्ये शिकवण्याचा अनुभव.*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_