कोकणमहाराष्ट्रशासकीय

राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय, 92 नगरपरिषदांच्या आणि चार नगपंचायतींच्या निवडणुका स्थगित

*_🛑राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय, 92 नगरपरिषदांच्या आणि चार नगपंचायतींच्या निवडणुका स्थगित*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*▪️मुंबई १४ जुलै-*
राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने 92 नगरपरिषदांच्या आणि चार नगपंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुका पुढच्या महिन्यात भर पावसात नियोजित करण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी सर्वपक्षीय मागणी होती. या मागणीचा विचार करता निवडणूक आयोगाने निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतला अशी चर्चा आहे. पण सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाबाबत सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने दिलेल्या आदेशांनुसार राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. या निवडणुका 18 आणि 19 ऑगस्टला नियोजित होत्या. या निवडणुकींसाठी 18 ऑगस्टला मतदान होणार होतं. तर 19 ऑगस्टला मतमोजणी होणार होती.
या पार्श्वभूमीवर या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित ठिकाणी आता आचारसंहिता लागू राहणार नाही. सुधारित निवडणूक कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत राज्य सरकारच्या वकिलांकडून निवडणूक प्रक्रिया आठ दिवस पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
काही दिवसांपूर्वी बांठिया आयोगानं राज्य सरकारला इम्पिरिकल डेटा सादर केला होता. इम्पिरिकल डेटाबाबतच हा डेटा सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आला. राज्य सरकारच्या वतीने कोर्टामध्ये जो इम्पेरिकल डाटा सादर करण्यात आलेला आहे. त्याच्या आधारावर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण लागू करावे अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश न्यायमूर्ती खानविलकर आणि न्यायमूर्ती पारडी वाला यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाकडे ही
सुनावणी झाली होती.महता याना युक्तिवाद केला. निवडणुकाचा कायक्रम जाहीर झाला आहे. हा कार्यक्रम रोखणे कठीण होणार आहे, या संदर्भात एक आयोग नेमण्यात आला आहे.
मात्र, जो पर्यंत अहवाल पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाला निवडणूक प्रक्रिया थांबवण्याचे निर्देश द्यावे, असा युक्तिवाद मेहता यांनी केला. निवडणुकीमध्ये ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला अशांची प्रक्रिया थांबवता येणार नाही, निवडणूक आयोगाने आपली भूमिका मांडावी, असं कोर्टाने स्पष्ट केलं. नामांकन प्रक्रिया जी उद्यापासून सुरू होणार आहे, न्यावर एक आठवड्याची स्थगिती द्यावी अशी मागणी केली होती. परंतु, राज्य निवडणूक आयोग व्यवस्थिती सांगू न शकल्यामुळे याचिका पास ओव्हर करण्यात आली आहे. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ती थांबवता येणार नाही, असं कोर्टाने स्पष्ट केलं होतं. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला.

 

 

*…सविस्तर बातमीसाठीखालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻

________________________

🎊🍔 *”द रूस्टर” कॅफे* 🎊

*🛣️सावंतवाडीत चाखायला मिळणार आता चटपटीत आणि चमचमीत पदार्थांची मेजवानी🥘🍕🫓🥪🍔🫔🍝*

🥖🥞🧇🍗🍖🌭🍔🍟🍕🧆🌮🌯

*🍲चिकन ग्रील, शोरमा, चिकन पाॅपकाॅर्न, अल्फाम आदी चटपटीत-चमचमीत पदार्थ मिळण्याचं एकमेव ठिकाण*

🍔 *Burger Bite*

🍔व्हेज बर्गर, 🥪चिकन बर्गर,🥙 व्हेज वॅप,🍔व्हेज बर्गर काॅम्बो,🌮 चिकन बर्गर काॅम्बो, 🌯व्हेज वॅप काॅम्बो, 🫔चिकन वॅप काॅम्बो,🌭 चिकन BBQ वॅप,🥪 मॅक्सीकॅन वॅप,

🍗 *Fride Chicken Feast* 🍗

🌮स्नॅक्स, 🍟क्रीप्सी स्नॅक्स, 🍝डिनर डिलाईट, 🧆फॅमिली पॅक,🍱 मिक्स पॅक 🥘फॅमिली स्पेशल, 🍣पार्टी मिल,

🧇 *Individual Treat* 🧇

*🍖चिकन स्ट्रीप्स, 🍗चिकन हाॅट व्हींग, 🫔चिकन नेगिट्स,🥖चिकन पाॅप रेग्युलर, 🌯चिकन फ्राईस,🫔 पाॅटेटो वॅजिस्*

🌯 *Arabian Tadka* 🌯

*🫔चिकन शोरमा, 🥖चिकन स्पाईसी शोरमा, 🌯चिकन जलापीयो शोरमा, 🧇चिकन चीझ शोरमा,🫔चिकन मीट शोरमा,🌯 चिकन मीट स्पायसी शोरमा 🥖चिकन चीझ स्पायसी शोरमा, 🌯चिकन मीट जलापीयो शोरमा*

*👉🏻🧃फ्रेश लिंबु सोडा,🥤 फ्रेश फ्रुट ज्युस, 🧋मिल्क शेक, 🍸थिक शेक, 🧉माॅकटेल्स, 🍧आईस्क्रीम उपलब्ध*
🌯🥖🍧🫔🧉🍸🧋🥤🧃🧇🍝🍗

🟢 *For Free Home Delivery :*
📱 9168010755

🛣️आमचा पत्ता: *रामेश्वर प्लाझा, सावंतवाडी*

🍗🌯🧇🍝🧃🥖🥤🧋🍸🧉🫔🍧
___________________________________

 

_______________________
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!